IPL 2020 : चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एका खेळाडूसह सपोर्टिंग स्टाफमधील 12 जण कोरोना पॉझिटिव्ह

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

IPL 2020 साठी चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एका खेळाडूसह सपोर्टिंग स्टाफमधील 12 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे आयपीएलसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, संघातील सर्व खेळाडूंची प्रकृती स्थिर आहे. मात्र चेन्नई संघाचा क्वारंटाईन कालावधी वाढला आहे.

यंदाचा आयपीएलचा तेरावा हंगाम बीसीसीआयने युएई दुबईत 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या काळात आयपीएल स्पर्धा खेळवली जाणार आहे. युएईत दाखल झाल्यानंतर चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाने कोणत्याही प्रकारे नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली होती. आयपीएलचे 8 संघ खेळाडू आणि इतर स्टाफ मिळून 1 हजारापेक्षा जास्त लोकं भारतातून युएईत आली आहेत.

दरम्यान, आयपीएल भारताबाहेर खेळवण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयावर अनेकांची टिकेची झोड उठविली आहे. याप्रकरणी काहींनी सर्वोच्च न्यायालयात देखील याचिका दाखल केली. मात्र, याचिकाकर्त्यांनी ही याचिका मागे घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here