सनी लिओनी कोलकाताच्या आशुतोष महाविद्यालयात ‘बीए’साठी घेणार अॅडमिशन!

कॉलेजच्या मेरिट लिस्टवर सनीला मिळाला पहिला क्रमांक, लिस्ट प्रचंड व्हायरल

कोलकाताच्या आशुतोष महाविद्यालयाच्या मेरिट लिस्टमध्ये सनी लिओनीचं नाव झळकल्यानं सनी लिओनी पुन्हा चर्चेत आली. महाविद्यालयानं BA ( honours)च्या प्रवेशाची पहिली मेरीट लिस्ट जाहीर केली. वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेली ही मेरीट लिस्ट पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण या लिस्टमध्ये बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचं नाव प्रथम क्रमांकावर होतं. तिच्या नावासोबत अर्जाचा आयडी आणि रोल नंबरही होता. तिला बारावीच्या परिक्षेत चार विषयांत पैकीच्या पैकी मार्क मिळाले आहे.

मेरिट लिस्टची कॉपी व्हायरल झाल्यानंतर त्यावर सनी लिओनीने सुद्धा ट्वीट करत मजा घेतली आहे. ती म्हणते “पुढच्या सेमिस्टरला कॉलेजमध्ये नक्की भेटू, आशा करते तुम्ही माझ्याच वर्गात असाल”.

मेरिट लिस्ट यादीचा फोटो इतका व्हायरल झाला की, महाविद्यालयाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. सनी लिओनीच्या नावानं अर्ज करुन कोणीतरी जाणीवपूर्वक खोडकरपणा केला असावा, असे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले. अॅडमिशन विभागाला त्यात दुरुस्ती करण्यास सांगितले असून याचा तपास केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here