मेट्रो प्रकल्प बैठक : आरे मधील मेट्रो कारशेड हलविणार ?

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

आरे कॉलनीत मेट्रोचे कारशेड बांधण्यासाठी अतिशय निर्दयीपणे 2700 झाडांची कत्तल करण्यात आली होती. ही झाडे तोडून येथे मेट्रोचे कारशेड बांधण्यात येणार होते. यावरून भाजप-शिवसेना सरकारच्या कार्यकाळात मोठा गोंधळ उडाला होता. आता याच मेट्रोचे कारशेड तिथून हलवण्याची चर्चा असल्याची माहिती समजते.

मेट्रो प्रकल्पाबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली.

ठाकरे सरकार आल्यानंतर कामकाजाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती दिली आणि पाच सदस्यीय समिती नेमून आरेऐवजी कारशेडसाठी दुसरी जागा निवडण्यास सांगितली होती. या समितीपुढे कांजुरमार्ग आणि इतर जागांसोबतच आरेपासून अवघ्या एक किमी अंतरावर असणाऱ्या रॉयल पामच्या जागेचा देखील विचार करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here