Crime : कोरोना सर्वेच्या नावे घरात घुसून चोरी करणारी टोळी जेरबंद

ज्येष्ठ महिलेच्या प्रसंगावधनाने चोरटे नागरिकांच्या तावडीत, चोप देऊन केले पोलिसांच्या स्वाधीन

सातारा येथील घटना

घरात कुणाला खोकला, ताप आहे का असे प्रश्न विचार कोरोना सर्वेच्या नावे घरात घुसून चोरी करणारी 4 जणांची टोळी जेरबंद झाली आहे. घरातील ज्येष्ठ महिलेच्या प्रसंगावधनाने चोरटे नागरिकांच्या तावडीत सापडले. नागरिकांनी या चोरट्यांना चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून प्रशासनाकडून घरोघरी कोरोना सर्व्हे केला जात आहे. याचाच संदर्भ घेऊन एका वृद्ध दाम्पत्याला मारहाण करुन लुटण्याचा प्रकार असफल ठरला. सातारा येथील रविवार पेठ इथे कोरोनाच्या सर्व्हेच्या नावाखाली घुसलेल्या चारजणांनी वृद्ध व्यक्तीला बंदुकीचा धाक दाखवत गळा दाबून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र घरातील वृद्ध महिलेच्या सतर्कतेमुळे चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांचा डाव उधळला.

ज्येष्ठ महिलेने आरडाओरडा केल्यामुळे, आजूबाजूचे नागरिक सतर्क झाले. त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन या चार भामट्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. यातील पाच जणांपैकी दोघेजण स्थानिकांच्या हाती लागल्यानंतर त्यांना चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here