Pathardi : आमदार मोनिका राजळे यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
आमदार मोनिका राजळे यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांवर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
दुधउत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी प्रदेश भाजपाच्या वतीने  राज्यव्यापी दुध एल्गार आंदोलन पुकारण्यात आले होते. आमदार राजळे यांच्या नेतृत्वाखाली 1 ऑगस्ट रोजी तालुक्यातील माळी बाभूळगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.
कोव्हिड 19 या रोगाच्या विषाणूचा संसर्ग पसरु नये म्हणून जिल्हाधिकारी यांचे जमावबंदीचा आदेश दिलेले असताना देखील अचानक एकत्र येऊन आंदेलन केले. या आदेशाचे उल्लंघन केल्याने आमदार मोनिकाताई राजळे, माणिक कोंडिबा खेडकर, विष्णुपंत रामनाथ अकोलकर, गोकुळ विष्णू दौंड, जनार्दन वांडेकर, प्रवीण किशोर राजगुरु व 30 ते 35 कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here