राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे ”दार उघड उद्धवा …दार उघड”

आघाडी सरकारचा मंदिर बंदचा निर्णय अन्यायकारकच; उद्धवा आता तरी दार उघडा – बाळासाहेब मुरकुटे

भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने शनिशिंगणापूरसह जिल्ह्यातील श्रीरामपूर, श्रीगोंदासह अन्य मुख्य मंदिरांसमोर आंदोलन

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी “दार उघड उद्धवा… दार उघड” अशा घोषणा देत टाळमृदुंगाचा गजर करत भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे आंदोलन केले. त्यासह जिल्ह्यात श्रीरामपूर, श्रीगोंदा येथे आमदार बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वात तसेच सर्वच मुख्य मंदिरांसमोर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. नेवाशात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व आध्यात्मिक समन्वय आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबनराव मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपचे नेवासा तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या नेतृत्वाखाली सोशल डिस्टनसिंगचे पालन करत मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत सकाळी १०.३० वाजता हे आंदोलन करण्यात आले. नेवासा तालुक्यात साठ ठिकाणी मंदिर प्रांगणाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. 

यावेळी शनिशिंगणापूर येथे आघाडी सरकारचा मंदिर बंदचा निर्णय हा भाविकांच्या दृष्टीने अन्यायकारक असून”उद्धवा आता तरी दार उघडा”अशी हाक घालत बाळासाहेब मुरकुटे यांनी आपल्या भावना यावेळी बोलताना व्यक्त केल्या. तीन तिघाडी काम बिघाडी, असा कार्यक्रम आघाडी सरकारचा सुरू असून मंदिरे बंद असणे हा भाविकांवरील अन्यायच आहे, म्हणून भाजपच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीने हे आंदोलन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले, युवा मोर्चाचे विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक रुढीला अनुसरून हे आंदोलन राज्यभर होत असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात लॉकडाऊन उठले असून देखील तीर्थक्षेत्रे व मंदिरे बंद आहे मंदिराचे दरवाजे या सरकारने खुले करावे, भजन प्रवचनाला परवानगी मिळावी म्हणून हे आंदोलन असून सरकारने याबाबत गांभीर्याने घ्यावे असे आवाहन केले.
यावेळी भाजपचे नेवासा तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की नेवासा तालुक्यात साठ ठिकाणी मंदिर प्रांगणाच्या बाहेर आंदोलन होत असून आघाडी सरकारने मद्यालयांना परवानगी दिली मात्र देवालयांना परवानगी दिली नसल्याने अनेक कीर्तनकार घरी बसून आहे. तर देवालयांसमोर उपजीविका करणारे व्यावसायिक देखील अडचणीत आले. त्यांची मोठ्या प्रमाणावर उपासमार होत आहे. तीच परिस्थिती कीर्तनकारांच्या बाबतीत आहे. या कोरोनाच्या संकटात शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला असल्याचे सांगून आता तरी या तिघाडी सरकारला मंदिरे खुले करण्यासाठी जाग यावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.यावेळी अध्यात्मिक आघाडीचे भिकचंद मुठे, ज्येष्ठ कार्यकर्ते बंडूभाऊ चंदेल, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पवार, भिकचंद मुठे, प्रतापराजे चिंधे, शिवप्रसाद महाराज, पंडित, अभिषेक महाराज जाधव, अंबादास उंदरे, बाळासाहेब

कु-हाट, कैलास दहातोंडे, नवनाथ गायकवाड, ऋषिकेश शेटे, रामदास सोनवणे, अरुण चांदगुडे, अँड.स्वप्नील सोनवणे, विशाल धनगर, संजय गायकवाड, भाऊसाहेब पोटफोडे, मनोज बोरुडे, लक्ष्मण बर्वे, विजय आव्हाड, पारस चोरडिया, शरद सोनवणे, शंकर ब-हाटे, सचिन मायवळे, दीपक सोनवणे उपस्थित होते.

श्रीरामपूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्रीरामपूरचे आराध्यदैवत प्रभू श्रीरामाच्या मंदिराबाहेर व साईबाबा मंदिर सुभाष कॉलनी, येथे हनुमान मंदिर, तसेच कुंभार गल्ली जय माता दि मंदिर पंजाबी कॉलनी, गुरुद्वारा दशमेश नगर सुर्यमुखी हनुमान मंदिर काचेरी रोड, व इतर मंदिराबाहेर घंटानाद करून ‘दार उघड उद्धवा दार उघड’ अशा घोषणा देऊन आघाडी सरकार विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता या आंदोलनामध्ये श्रीरामपूर भाजपाचे शहर संघटन सरचिटणीस सतीश सौदागर , माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,भाजपा संपर्क अभियान संयोजक विशाल अंभोरे ,नाथपंथी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद हिंगमिरे , रुपेश हरकल, राजेश पाटील , पंकज करमासे, ज्ञानेश्वर कांबळे , गणेश हिंगमिरे प्रसाद तुसर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

श्रीगोंद्यात आमदार बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वात आंदोलन
दारू दुकाने सुरु होऊ शकतात धार्मिक स्थळे का नाही – बबनराव पाचपुते

राज्य सरकारला दारूची दुकाने सुरु करण्याची घाई झाली होती पण धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी का दिली  जात नाही असा सवाल आमदार बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदा येथे आयोजित आंदोलनात केला. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जनजीवन पूर्ववत करण्यासाठी महाविकस आघाडी सरकारने राज्यातील मॉल, मांस, मदिरा पुनश्च हरी ओम च्या नावाखाली सर्व काही चालू केले.मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात हरी ला मात्र बंदिस्त ठेवले आहे.संतभूमी महाराष्ट्रात मद्य मुबलक सुरु आहे. आणि भजन पूजन करणारे  भाविक भक्तांवर गुन्हे दाखल होत आहेत.भाविक भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल, असा सरकारचा कारभार सुरु आहे, सरकारकडून दारूचे दुकाने उघडण्यास परवानगी मिळते, मग धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी का नाही ! असा सवाल या घंटानाद आंदोलनावेळी आमदार बबनराव पाचपुते यांनी केला.
यावेळी जिल्हा चिटणीस सुनीलराव थोरात , भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, उपनगराध्यक्ष अशोकराव खेंडके, महिला अध्यक्षा सौ.सुहासिनी गांधी, दादाराम ढवाण,  भाजपा कार्याध्यक्ष राजेंद्र उकांडे,  भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष रायकर,शहराध्यक्ष संतोष खेतमाळीस, माजी सभापती शहाजी हिरवे, नगरसेवक शहाजी खेतमाळीस,संग्राम घोडके, सुनील वाळके, अंबादास औटी, महावीर पटवा, दिपक हिरनावळे, मंदाकिनी शेलार, नितीन नलगे,  दत्तात्रय जगताप संतोष धोत्रे मेजर ,बापूराव जाधव ,विजय वाकडे , अमोल अनभुले, विशाल राऊत, नमन भंडारी, कुंडलिक गाडे, भगवानराव वाळके, चंद्रकांत खेतमाळीस, महेश क्षीरसागर, उमेश बोरुडे, संतोष क्षीरसागर, रोहित गायकवाड, नवनाथ हिरवे, राजेंद्र मोटे, मुक्तार शेख, विनोद धामणे, विनोद होले, इ.पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत  सामाजिक अंतर ठेऊन शनिमंदिर श्रीगोंदा येथील धार्मिक स्थळाजवळ घंटानाद आंदोलन करण्यात आले.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here