दादा पाटील महाविद्यालयातील कोव्हीड सेंटरला माजी मंत्री राम शिंदे यांची भेट

3

आरोग्य सेवेचा घेतला आढावा

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

कर्जत : या काळात घाबरू नका, स्वताची काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा असा सल्ला देत कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयातील कोव्हीड सेंटरला माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी शनिवारी भेट दिली. यासह कोव्हीड सेंटर येथील आरोग्य सेवेचा आढावा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप पुंड यांच्याकडून घेतला. यावेळी त्यांच्या सोबत भाजपाचे  सुनील यादव उपस्थित होते.
           घंटानाद आंदोलनासाठी माजी मंत्री प्रा राम शिंदे कर्जत येथे आले होते. अचानक त्यांनी कर्जत शहरातील दादा पाटील महाविद्यालयातील कोव्हीड सेंटरला भेट देत तेथील कोरोनाबाधीत रुग्णाची आस्थेने विचारपूस करत या काळात घाबरू नका, स्वताची व्यवस्थित काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा असा सल्ला दिला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप पुंड यांच्याकडून कोव्हीड सेंटरच्या आरोग्य सेवेचा आणि कोरोना उपचाराविषयी आढावा घेतला. यासह उपस्थित असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना ही स्वताची आणि आपल्या परिवाराची काळजी घेण्याचा सल्ला दिला.
दादा पाटील महाविद्यालयातील रुग्णासोबत कोव्हीड सेंटरला सवांद साधताना अचानक एक लहान मुलगी खेळताना प्रा राम शिंदे यांना दिसली असता तिची आस्थेने विचारपूस केली. तुला काही त्रास होत नाही ना ? असे विचारले असता तिने हसत मी छान आहे. लवकरच घरी जाणार आहे असे सांगितले असता राम शिंदे यांनी तिच्या वडिलांना तिची चांगली काळजी घ्या. तसेच तिला लवकर घरी जा म्हणत भावी आरोग्यास शुभेच्छा दिल्या.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here