राज्यातील बिघाडी सरकार हॉटेल, ढाबे सुरू करतंय

मग संतांचा वारसा असणाऱ्या महाराष्ट्रात मंदिरे बंद का – माजीमंत्री राम शिंदे

प्रतिनिधी | राष्ट्रसह्याद्री दि.२९
कर्जत : राज्यात तीन तिघाडीचं सरकार हॉटेल, ढाबे , इतर व्यवसाय – व्यापारपेठ सुरू करतंय पण भाविकांसाठी मंदीर खुले करीत नाहीत ही मोठी शोकांतिका आहे. महाराष्ट्राला संत ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्यासारख्या अनेक संतांचा वारसा असून राज्य सरकार मंदिर का बंद ठेवत आहे ? याचे उत्तर त्यांच्याजवळ नाही. जर त्यांनी लवकरात लवकर मंदीर सुरू केली नाहीत तर आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असे प्रतिपादन माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले. ते कर्जत येथे ग्रामदैवत श्री संत गोदड महाराज मंदिरासमोर भाजपाच्या घंटानाद आंदोलन प्रसंगी बोलत होते.
           दि.२९रोजी कर्जत येथील ग्रामदैवत श्री संत सदगुरु गोदड महाराज मंदिर येथे भाजपाच्यावतीने मंदीर सुरू करावे यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना प्रा. शिंदे म्हणाले की, राज्यात तीन पक्षाचे आघाडी सरकार नसून बिघाडी सरकार आहे. मागील पाच ते सहा महिन्यापासून यांनी सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारे दिलासा देण्याचे काम केले नाही. केंद्र सरकारने दिलेल्या विविध लोकाभिमुख योजना या राज्य सरकारला राबविता आले नाहीत. उलट हे सरकार आपल्याच पायात – पाय घालत जनतेला वेठीस धरत आहे. सध्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला पड्या दराने विकत घेत आहे. यासह भाजी बाजार, जनावरांचा बाजार त्यांनी लवकरात लवकर सुरू करत शेतकऱ्याना आधार देण्याचे काम करावे अन्यथा आगामी काळात भाजपा तीव्र आंदोलन करेल याची दखल राज्य सरकारने घ्यावी असा इशारा राम शिंदे यांनी दिला. यावेळी मंदिरातील पुजाऱ्यांनी त्यांच्या प्रश्नाचे निवेदन माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांना दिले.
        यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब महाडीक,निवृत्ती महाराज नेटके,उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, जेष्ठ नेते शांतीलाल कोपनर, सुनील यादव,तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, स्वप्नील देसाई, प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे, अमृत काळदाते, काकासाहेब धांडे, रामदास हजारे, सतीश समुद्र, अनिल गदादे, पप्पू धोदाड, राहुल निंबोरे, विश्वास डमरे, राहुल गांगर्डे आदी. उपस्थित होते.

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here