Sangamner : कोरोनाबाधित रुग्णसंख्या 1642; कठोर उपायांची गरज

प्रतिनिधी | विकास वाव्हळ | राष्ट्र सह्याद्री 

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेन-दिवस वाढत असून बाधित रुग्ण दररोज नवनवीन उच्चांक प्रस्थापित करत आहे. आज सकाळी 47 रुग्णांचे अहवाल प्रशासनास प्राप्त झाले असून एकूण बाधित रुग्णसंख्या देखील थेट 1642 वर जाऊन पोहचली आहे. कोरोनाच्या या विषाणूंनी शहरातील जवळ, जवळ बहुतेक प्रभागात व तालुक्यातील जवळ, जवळ बहुतेक गाव,वाडी, वस्ती वर शिरकाव गेल्याचे दिसते. त्यामुळे नागरिकांना काळजी वाटत आहे.

काल सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालातून शहराच्या रुग्णसंख्येत तब्बल 42 रुग्णांची भर पडली होती. तर आज सकाळी 47 रुग्ण वाढले आहेत. काही तासातच 89 रुग्ण वाढले आहेत. कालच्या रुग्णांमध्ये 45 वर्षीय महिला, मालदाड रोड 64 वर्षीय व्यक्ती, स्वामी समर्थ नगर 40 वर्षीय तरुण, उपासनी गल्ली 35 वर्षीय महिलेसह 15 वर्षीय मुलगा, गणेशनगर 34 वर्षीय महिला, शिवाजीनगर 55 वर्षीय व्यक्तीसह 34 वर्षीय तरुण, पावबाकी रस्त्यावरील 67 वर्षीय व्यक्ती, निमोण 52 वर्षीय व्यक्ती, जोर्वे  57 वर्षीय व्यक्ती, कवठे धांदरफळ 55 वर्षीय व्यक्ती, कनोली 50 वर्षीय व्यक्ती, जाखुरी 36 वर्षीय तरुण, घुलेवाडी 80 वर्षीय व्यक्ती व 38 वर्षीय तरुणाचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.

शहरातील शिवाजीनगर 61 वर्षीय व्यक्ती, कवठे कमळेश्वर 24 वर्षीय तरुण, आभाळवाडी 29 वर्षीय तरुण, तर बोटा येथील 65, 36, 34 व 31 वर्षीय पुरुषांसह 27, 24 व 16 वर्षीय तरुणी, चंदनापुरीतील 40, 36, 25, 26 व 24 वर्षीय महिलांसह 32 वर्षीय तरुण, 13 व 07 वर्षीय मुले व 03 वर्षीय बालिका, शिबलापुर 42 वर्षीय व 20 वर्षीय तरुण, पानोडी 27 वर्षीय तरुण, सोनेवाडी 59 वर्षीय पुरुष, गुंजाळवाडीतील केशवनगर 27 वर्षीय महिला व 05 वर्षीय बालक असे 42 रुग्णांचा संक्रमित झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने काल रात्री तालुक्याची बाधित रुग्ण संख्या 1595 वर जाऊन पोहोचली होती. त्यात आज सकाळी पुन्हा 47 रुग्णांची भर पडली आहे.

आज प्रशासनास प्राप्त झालेल्या अहवालातून शहरातील उपासनी गल्ली 51 वर्षीय व्यक्ती व 41 वर्षीय महिला, 16 वर्षीय तरुण, 05 वर्षीय बालक, गणेशनगर 40 वर्षीय तरुण, पावबाकी रोड भागातील 70, 46, 45 व 25 वर्षीय महिला, रंगारगल्ली59 वर्षीय व्यक्तीसह 57, 30 व 28 वर्षीय महिला, माळीवाडा 24 वर्षीय तरुण, 28 वर्षीय तरुण तर तालुक्यातील  रहाणेमळा 38 वर्षीय तरुण, शिरसगाव धुपे 27 वर्षीय तरुण, निंभाळे 70 वर्षीय महिला, खांडगाव 55 वर्षीय व्यक्ती व 50 वर्षीय महिला, रहिमपूर 55, 37 व 29 वर्षीय पुरुषांसह 40, 36, 26, 25, 20, 18 व 15 वर्षीय महिला व 07 वर्षीय बालक, घुलेवाडी 46 व 29 वर्षीय तरुणांसह 09, 02, 07 व 03 वर्ष वयाच्या बालकांसह 29, 26, 20, 18 व 13 वर्षीय महिला व 02 वर्षीय बालिका, खराडी 26 वर्षीय तरुणाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. संगमनेर शहरासह तालुक्याच्या रुग्णसंख्येत आजही मोठी भर पडल्याने तालुक्याच्या रुग्णसंख्येने सोळावे शतक पार करुन 1642 संख्या गाठली आहे.

जिल्यात संगमनेर मध्ये बाधित रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे त्यामुळे प्रशासनाने देखील आता ठोस पावले उचलली पाहिजेत. परंतु जे नागरिक नियम पाळतात त्यांना वगळून नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी जेणेकरून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखला जाईल, असे कार्य करावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here