Sangamner : उद्धवा तुझा कारभारच धुंद, मदिरा चालू, मंदिर बंद

संगमनेरमध्ये जैन मंदिरासमोर विश्व हिंदू परिषदेचे आंदोलन

उद्धवा तुझा कारभारच धुंद, 
मदिरा चालू, मंदिर बंद,
दारू नको दार उघड उद्धवा दार उघड,
भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल, 
उद्धव सरकार झाले फेल,

अशा घोषणा देऊन संगमनेरातील प्रमुख मंदिरांच्या बंद दरवाजांपुढे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांनी आंदोलन केले. कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमध्ये मंदिरे व सर्व धर्मीयांची प्रार्थना स्थळे बंद ठेवण्यात आली होती. आता अनलॉकच्या प्रक्रियेत ही मंदिरे उघडण्यासाठी भाजपसह विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांनीही आंदोलन सुरु केले.

गावातील रंगरगल्ली येथील शनी मंदिर, मारुती मंदिर, सोमेश्वर मंदिर, दत्त मंदिर, स्वामी समर्थ मंदिर,बस स्थानका जवळील गुरू द्वारा तसेच पार्श्वरनाथ गल्लीतील जैन मंदिरासमोर उद्धव ठाकरे यांच्या नावाने दार उघडच्या घोषणा देत घंटानाद करण्यात आला.

त्यानंतर प्रांत अधिकारी, तहसीलदार यांना मठ, मंदिर उघडण्या संदर्भात निवेदन देण्यात आले त्यावर प्रशांत बेल्हेकर, सचिन कानकाटे, ज्ञानेश्वर कर्पे,कुलदीप ठाकूर, विशाल वाकचौरे, आकाश राठी, गोपाल राठी, गणेश बंगाळ, आशिष ओझा, रवी मंडलिक, शुभम कपिले, संदीप वारे रमेश शहरकर, शिवकुमार भंगीरे, राहुल भोईर, किशोर गुप्ता, वाल्मिक धात्रक सह विश्व हिंदू परिषद, बजरंग दल चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here