भाजपच्या घंटानादाने जिल्हा दणाणला!

4

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यभर आंदोलने सुरु आहेत. त्याअंतर्गत अहमदनगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भाजपकडून घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांसह विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांचाही समावेश दिसून आला. अहमदनगर शहरात गौरी घुमट येथे तर सर्जेपूरा येथील बजरंगबलीच्या मंदिराबाहेर घंटानाद आंदोलन करण्यात आले. 

आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाने भारतीय जनता पार्टी, शेवगाव तालुका यांच्यावतीने  शेवगाव तालुक्यात जगदंबा देवी, भाविनिमगाव, पावन गणपती मंदिर शेवगाव तसेच बोधेश्वर मंदिर बोधेगाव आदी ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आले.

देवस्थाने सुरु होणेसाठी भाजप तालुकाध्यक्ष ताराचंद लोंढे, शहर अध्यक्ष रवींद्र सुरवसे, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन वारकड, महिला आघाडी अध्यक्ष आशाताई गरड, सरचिटणीस भीमराज सागडे,नगरसेवक अशोक अहुजा, सुनील रसाने, वाय. डी. कोल्हे,  कचरू चोथे, राजेंद्र डमाळे, उदय शिंदे, संदीप खरड,  संदीप देशमुख, कासम शेख, शरद चाबुकस्वार,  बंडूशेट मेहेर, जगदीश धूत, सागर फडके, संतोष कंगणकर, अमोल घोलप,  राहुल बंब, विठ्ठल बिडे, रामहरी घुले, सुभाष बरबडे, विजय नजन, मुसाभाई शेख, सुरेश थोरात, गुरुनाथ माळवदे, लक्ष्मण काशीद, पवार महाराज, बशीर पठाण, दिगंबर टोके, राजेंद्र घनवट, अजय डमाळ, काका हरदास, सुभाष वाघमारे गोकुळ निकम, आदी मान्यवरांनी आंदोलनात सहभाग घेतला.

कर्जत येथे ग्रामदैवत संत गोदड महाराज मंदिरा समोर भाजपाचे वतीने घंटानाद आंदोलन करत दार उघड उद्धवा दार उघड, असे आवाहन राज्याचे प्रदेशउपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी केले. राज्यामध्ये कोरोनाचा कहर वाढलेला असताना राज्यामध्ये महाआघाडी सरकारने मंदिरे बंद ठेऊन मदिरालये सुरू करण्यात आली आहेत, मॉल उघडले आहेत रस्त्यावर गर्दी वाढली आहे मग फक्त मंदिरच बंद का? असा प्रश्न उपस्थित करत भाजपाने पुकारलेल्या घंटानाद आंदोलन पुकारले असून कर्जत येथे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज मंदिरा समोर भाजपाचे वतीने घंटानाद आंदोलन करत दार उघड उद्धवा दार उघड असे आवाहन राज्याचे प्रदेशउपाध्यक्ष प्रा राम शिंदे यांचे नेतूत्वाखाली भाजपा पदाधिकारी व भाविकांनी उपस्थित राहत  केले.
यावेळी शांतीलाल कोपनर, समनव्यक पप्पू शेठ धोदाड, सरचिटणीस सुनील काळे, सरपंच काकासाहेब धांडे, स्वप्निल देसाई, सुनील यादव, अमृत काळदाते, रामदास हजारे, ह. भ. प. राहुल पिंपळे, रसाळ महाराज, अनिल गदादे, सतीश समुद्र, हनु गावडे, आदीसह  ऊपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे यांनी केले.  यावेळी प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते गोदड महाराजांची आरती करण्यात आली तर पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
झोपलेल्या ठाकरे सरकारला जाग येण्यासाठी अध्यात्मिक समन्वय आघाडी व भाजपा यांच्या वतीने निमगाव खैरी येथे वाघाई मंदिराजवळ मंदिरे सुरू करा या मागणी करिता जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद अंदोलन करण्यात आले.

या अंदोलनामध्ये हभप बाळासाहेब महाराज रंजाळे, हभप दादा महाराज रंजाळे, हभप शुभम महाराज बनकर, हभप विजय महाराज बनकर, बाजार समितीचे उपसभापती नितीनराव भागडे, भाजपा तालुका उपाध्यक्ष व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रामभाऊ तरस, सोसायटीचे संचालक सोपानराव कालंगडे आदी उपस्थित होते.
*शिर्डीत सुजय विखे यांच्या नेतृत्वात आंदोलन*
श्रीरामपूर शहरातील बेलापूर येथेही घंटानाद आंदोलन

4 COMMENTS

  1. Thanks for sharing excellent informations. Your site is so cool. I’m impressed by the details that you have on this web site. It reveals how nicely you understand this subject. Bookmarked this website page, will come back for extra articles. You, my friend, ROCK! I found just the information I already searched all over the place and just couldn’t come across. What a perfect web-site.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here