Beed : उद्धवा अजब तुझे सरकार-खुले करा हरीचे दार..!

0

राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वात भाजपाने उघडले बालाजी मंदिराचे दार

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

महाराष्ट्र ही संतांची भूमी. केंद्र सरकारने देशात कोरोना लॉकडाऊन जाहीर केला असून धार्मिक स्थळं,मंदिरे,देवस्थाने सुरु करण्याची परवानगी दिली आहे. देशातील अनेक भागात देवदर्शन सुरु झाले आहे. संतांच्या या भूमीत राज्यसरकारने भाविक भक्तांना देवदर्शनापासून वंचित ठेवले आहे. राज्यात दारूविक्रीसह अनेक दैनंदिन व्यवहार सुरु करण्यात आले. खाजगी प्रवासी वाहतुकीला बंदी घालून बससेवा सुरु केली. दारू विक्रीही जोमात सुरु आहे परंतु मंदिरांबाबत सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही देवदर्शन व मंदिरातून सकारात्मक ऊर्जा मिळतेच. शिवाय मंदिर व धार्मिक स्थळांमुळे लाखो कुटुबांची उपजीविका चालते.

साधू,संत,महंत,आचार्य,धार्मिक संघटना व भाविक भक्तांनी मंदिरं खुली करणेबाबत मागणी करूनही याकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही. राज्यातील सर्व मंदिरे खुली करावीत यासाठी आज भाजपा प्रदेशच्या वतीने राज्यव्यापी घंटानाद आंदोलन केले जात आहे. जनतेच्या सहनशीलतेचा अंत न पाहता देवदर्शनासाठी मंदिरे खुली करावीत, असे आवाहन भाजपाचे बीड जिहाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी आज घंटानाद आंदोलन प्रसंगी केले.

पंकजा गोपीनाथ मुंडे व भाजपा प्रदेश उपाध्यक्षा खा.डॉ. प्रितम गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वात आज सकाळीच दार उघड उद्धवा दार उघड- उद्धवा अजब तुझे सरकार खुले करा हरीचे दार..! अशा घोषणा देत टाळ, मृदूंग व घंटानाद करत बीड शहरातील पेठ बीड येथील बालाजी मंदिरासमोर घंटानाद करून मंदिराचे दार उघडण्यात आले, माळीवेस भागातील मारुती मंदिरासमोर भाविक भक्त व कार्यकर्त्यांसह सोशल डिस्टंसिंगचे पालन करून आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढा, बाळकिसन सिकची,विजयकुमार पालसिंगणकर,नवनाथ अण्णा शिराळे, दत्ताजी नलावडे, भगीरथ दादा बियाणी, विक्रांत हजारी, डॉ. लक्ष्मण जाधव,सचिन उबाळे, शांतिनाथ डोरले, अनिल चांदणे, संग्राम बांगर, विलास बामणे, ॲड संगीता धसे, संध्या राजपूत, मीरा गांधले, शैलजा मुसळे, संजीवनी राऊत, अनिता जाधव, बालाजी पवार ,गणेश तोडेकर, उत्तरेश्वर घोडके, लाला पन्हाळे,सरपंच रामा बांड,दत्ता परळकर, अमोल वडतीले, कपिल सौदा, बाबा गव्हाणे, बंडू मस्के, महेश सावंत, बद्रीनाथ जटाळ, अर्जुन राव बोंडगे, गणेश मोरे, विजय देशमुख, संभाजी सुर्वे, दिलीप डोंगर ,नितीन डिसले,गणेश माने,अजय त्रिभुवन,विशाल गायकवाड,भोला जाधव, रविंद्र कळसाने, कृष्णा बहिरवाळ, विलास सातपुते, सतपाल लाहोट,नागेश पवार,आकाश घोरपडे, रोहित चव्हाण, बाळासाहेब दोडके,सुरवसे मामा यांच्यासह भाविकभक्त नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.

जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थाने असणाऱ्या परळी येथील वैद्यनाथ मंदिर,योगेश्वरी मंदिर अंबाजोगाई,अंबाचोन्डि मंदिर धारूर,सिद्धेश्वर मंदिर शिरूर,बेलेश्वर संस्थान बेलेश्वर,चिंतेश्वर महादेव मंदिर गेवराई,या मंदिरांसमोरही भाजपाच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here