प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून देशातील शेतक-यांचे कौतूक, वाचा काय म्हणाले,

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

आपल्या देशात या वर्षी गेल्यावर्षीच्या तुलनेत खरीप हंगामात 7 टक्क्यांनी जास्त पेरण्या झाल्या. कोरोनाच्या या कठिण काळात शेतक-यांनी आपली क्षमता सिद्ध केली. मी त्यांच्या मेहनतीला वंदन करतो, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतक-यांचे कौतूक केले.

दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रधानमंत्री मन की बात मधून देशवासीयांशी संवाद साधत असे. आज 30 ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या रविवारी त्यांनी देशातील शेतक-यांचे कौतूक केले. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श केला.

यामध्ये खेळण्यांचा विषय आवर्जून मांडला. जगात खेळण्यांची बाजारपेठ 7 लाख कोटींची आहे. मात्र, भारताचा याच्यातील वाटा खूपच कमी आहे.

मुलांच्या जीवनातल्या वेगवेगळ्या पैलूंवर खेळण्यांचा प्रभाव पडत असतो. याविषयी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निश्चित करतानाही खूप लक्ष देण्यात आले आहे. मी आपल्या स्टार्ट-अप मित्रांना, आपल्या नव उद्योजकांना सांगू इच्छितो की, ‘टीम अप फॉर टॉइज’-चला, सर्वजण मिळून खेळणी बनवूया! आता सर्वांसाठी ‘लोकल’-स्थानिक खेळण्यासाठी ‘व्होकल’ होण्याचा हा काळ आहे, असं पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, अभियानामध्ये आभासी खेळ असो खेळण्यांचे क्षेत्र असो, सर्वांनी अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली पाहिजे आणि ही एक संधीही आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये देशाला #AatmaNirbhar बनवायचे आहे. असहकार आंदोलनाच्या रूपातून ते बीजारोपण झाले होते, त्याला आता, #AatmaNirbharBharat च्या वटवृक्षामध्ये परिवर्तित करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असं पंतप्रधान म्हणाले.

एक अॅप आहे- ‘आस्क सरकार’ यामध्ये चॅट बोटच्या माध्यमातून तुम्ही संवाद साधू शकता आणि कोणत्याही सरकारी योजनेविषयी माहिती जाणून घेवू शकता, असंही पंतप्रधान यांनी सांगितलं.

सण उत्सवातील साधेपणा

सध्या सण-उत्सवांचा काळ आहे. मात्र यंदा कोरोनामुळे आपण प्रत्येक सण-उत्सव अतिशय साधेपणाने साजरा करत आहोत. प्रत्येक ठिकाणी शिस्त दिसत आहे. अनेकांनी तर ऑनलाईन गणेश उत्सव साजरा केला. देशामध्ये होत असलेल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये संयम आणि साधेपणाचे यंदा दर्शन होत आहे, हे अभूतपूर्व आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here