Unlock 4 : 7 सप्टेंबरपासून देशात रेल्वे सेवा सुरू होणार

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

देशात केंद्र सरकारकडून अनलॉक 4 साठी गाईडलाईन जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक वाहतूकीवरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

अनलॉक 4 मधील महत्वाचे मुद्दे

देशात कुठेही व्यक्ती किंवा वाहन प्रवासासाठी आता कोणत्याही परवानगीची आवश्यकता नसल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

  • 21 सप्टेंबरपासून सोशल अॅकेडमिक, खेळ, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यासाठी 100 लोकाचं बंधन असणार आहे.
  • 21 सप्टेंबरपासून ओपन एअर थियटर्स उघडण्यास संमती.
  • शाळा आणि महाविद्यालय 30 सप्टेंबर पर्यंत बंदच राहणार.
  • 9 वी ते 12वीचे विद्यार्थी शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी शाळा, महाविद्यालया जाऊ शकतात. मात्र, यादरम्यान सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे.
  • कंटेनमेंट झोनमध्ये चित्रपटगृह, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क आणि थियटर्स बंदच राहणार आहेत. याठिकाणी 30 सप्टेंबर 2020 पर्यंत लॉकडाऊन लागू असणार आहे.
  • लग्न आणि अंत्यसंस्कार यासाठी सध्या असलेली माणसं जमवायची मर्यादा २० सप्टेंबर पर्यंत कायम राहील. २१ सप्टेंबर पासून १०० माणसांना परवानगी

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here