Beed : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून ‘या’ शहीद श्वान सैनिकाचा सन्मान

मन की बात मधून केला उल्लेख सोबतच बीड पोलिसांचेही कौतुक

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून बीड पोलीस दलातील शहीद ‘श्वान’ सेनानी रॉकी याचा सन्मान केला. सोबतच या शहीद श्वानाला बीड पोलिसांनी जो सन्मान दिला त्याबद्दल त्यांचेही कौतुक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. 

आपल्या मन की बात या कार्यक्रमात आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बीड पोलीस व पोलिसांच्या पथकातील त्यांना सदैव मदत करणा-या रॉकी या श्वानाच्या कामाचा उल्लेख केला. तसेच तो शहीद झाल्यानंतर बीड पोलिसांनी त्याला दिलेल्या सन्मानाबद्दल बीड पोलिसांचेही कौतुक केले.

15 ऑगस्ट 2020 रोजी बीड पोलीस दलातील श्वान सेनानी रॉकी शहीद झाला होता. त्यानंतर बीड पोलिसांनी त्याच्या मृत्यूनंतर त्याचा यथोचित अंत्यविधी केला. तसेच त्याला सन्मानही दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः रॉकीच्या कामगिरीबद्दल उल्लेख केला आहे. तसेच बीड पोलिसांनी शहीद रॉकीला जो सन्मान दिला त्याबद्दल कौतुक केले आहे.  त्यांच्या शब्दांमुळे आम्हा बीड पोलीस दलाच्या प्रत्येक सदस्याला प्रेरणा, कर्तव्यनिष्ठा आणि ऊर्जा मिळत आहे. रॉकीच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल बीड पोलीस दलातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनपूर्वक धन्यवाद देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here