Beed : ख्रिश्चन दफनभूमीतील प्रार्थना सभागृहाचे काम लवकरच सूरू करू – डॉ. भारतभूषण क्षीरसागर

ख्रिश्चन समाज दफनभूमीत वृक्षारोपण संपन्न
 
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

नव्याने नाव दिलेल्या मदर तेरेसा चौकातील ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमी ठिकाणी आज नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न झाले.
यावेळी संरक्षक भिंतीची नगराध्यक्षांनी पहाणी केली व समाधान व्यक्त केले. त्यांच्या हस्ते मदर तेरेसा यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला पूष्पहार घालून मेणबत्ती लावण्यात आले. यावेळी ख्रिश्चन समाजाच्या वतीने त्यांचा आभाररूपी सत्कार करण्यात आला. यावेळी समाजाच्या वतीने संरक्षक भिंत बांधून दिल्याबद्दल आभार मानले व नगराध्यक्षांनी मंजूर केलेल्या अंत्यविधीपूर्वी प्रार्थना सभागृहाची आवश्यकता असून रस्ते स्वच्छतागृहाचे काम सूरू करावे, अशी विनंती अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे अध्यक्ष आशिष शिंदे यांनी केली.
यावेळी नगराध्यक्ष बोलतांना म्हणाले की, ख्रिश्चन समाज हा जागतिक स्तरावर काम करणारा असून मी स्वतः तूर्कस्थान येथिल टर्की येथिल पविञस्थानाला भेट दिलेली आहे. यावेळी मदर तेरेसा यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला व सदैव ख्रिश्चन समाज आम्हांला साथ देत आला आहे. तसेच लवकरात लवकर ख्रिश्चन दफनभूमीतील प्रार्थना सभागृहाचे काम सूरू केले जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी दफनभूमी ठिकाणी दोन हजार झाडे लावणारे जिल्ह्यातील पहिलीच दफनभूमी असावी, असा उल्लेख देखील त्यांनी केला. वृक्षारोपणाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. व स्मशानभूमीचे काम पूर्ण करणे हे आमचे कर्तव्य असून ते पुण्याचं देखील काम आहे. यावेळी ख्रिश्चन धर्मगूरू रेव्ह. जयराज शिंदे यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली व फादर प्रकाश भालेराव यांनी आशीर्वाद दिले.
यावेळी नगरसेवक विनोद मुळूक, पाणी पूरवठा सभापती रवींद्र कदम, कपिल सोनवणे, चंदू वडमारे, किशोर पाटील,  विष्णू भाऊ दुधाळ, अरूण गायकवाड, मरियन रेड्डी, प्रेमविजय भालतिलक, राजू जोसेफ, अँन्थनी जोसेफ, निलीमा रामटेके, सिस्टर शर्मिला पाटील, सिस्टर आशा, सेंट अँन्सच्या सिस्टर अँनी, शिला बन्सोडे, स्टिवन केदारी, सिस्टर ज्यूली, रेव्ह. चार्लस सोनावणे, विनिता भालतिलक, बाबासाहेब गायकवाड, आशिष शिंदे, जो जो सर, राम वाघ यांच्या ख्रिश्चन समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here