Shrigonda : शासकीय कार्यालये कोरोनाच्या कचाट्यात

पंचायत समितीनंतर, पोलीस स्टेशन व आता दुय्यम निबंधक कार्यालय

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा तालुक्यातील काही शासकीय कार्यालये कोरोनाच्या कचाट्यात सापडू लागल्याने शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात कोरोना फोफावत चालला आहे. त्यामुळे कार्यालय बंद ठेवावीत की चालू ठेवावी याबाबत शंका कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. मात्र, तरीही कार्यालयातील गर्दी ओसंडून वाहताना दिसत आहे.

कोरोना कोण घेऊन येईल कोठून येईल यातून कोणालाही सुटका नाही. या भीतीने श्रीगोंदा तालुक्यातील शासकीय कार्यालये मोठ्या प्रमाणात भीतीने त्रस्त आहेत. सुरुवातीला पंचायत समितीमधील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे साधारण ४ दिवस पंचायत समितीचे कामकाज थांबविण्यात आले होते. त्यानंतर श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा पोलीस स्टेशसनमधील काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. त्यांना सुमारे ११ दिवस उपचारासाठी होम क्वारंटाईन करण्यात आले. त्यानंतर ते काही दिवसात कर्तव्यावर रुजू झाले. मात्र, इतर कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची दहशत कायम असताना आता पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेले दुय्यम निबंधक कार्यालयात एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे.

त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालय सुमारे ४ दिवस बंद ठेवण्याचा आदेश अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांनी काढला आहे. त्यामुळे आता दुय्यम निबंधक कार्यालय सुमारे चार दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे एकंदरीत पंचायत समिती त्यानंतर श्रीगोंदा पोलीस स्टेशन व आता दुय्यम निबंधक कार्यालय अशी अनेक कार्यालयातील कर्मचारी कोरोना बाधित सापडली असल्यामुळे तालुक्यातील शासकीय कार्यालये कोरोनाच्या कचाट्यात सापडत चालली आहेत, असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. मात्र, तरीही शासकीय कार्यालयातील होणारी गर्दी मात्र कोणत्याही प्रकारे कमी होताना दिसत त्यामुळे तालुक्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. यासाठी जनतेने स्वतःहून लक्ष घालण्याची खरी गरज निर्माण झाली आहे, असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.
कोरोनाचे संकट लोकांनी गांभीर्याने घ्यावे – नितीन खामकर तालुका आरोग्य अधिकारी 

श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. प्रत्येकाने यापासून बचाव करण्यासाठी नियमाचे पालन करण्याची गरज आहे. लोकांनी गर्दी करू नये तसेच शोषलं डिस्टन्स, मास्क वापरण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी नितिन खामकर यांनी केले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here