प्रकाश आंबेडकरांचे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश करीत आंदोलन, म्हणाले आजपासून मंदिरं खुली झाली असं समजा

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश करीत आंदोलन करण्यासाठी पंढरपूरला रवाना झाले. या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी पोलीस बंदोबस्त असला तरी आम्ही आमचं आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

  • प्रकाश आंबेडकरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा नाहीच, आंबेडकरांनी दीड तास वाट बघितली, प्रकाश आंबेडकर शासकीय विश्रामगृहावरुन आंदोलनस्थळाकडे रवाना, आंबेडकर आंदोलनावर ठाम, शांततेत आंदोलन व्हावं यासाठी पोलिसांकडून प्रयत्न
  • आंदोलनाला अनेक वारकरी संघटनांचा पाठिंबा, मात्र आंदोलनात सहभागी वारकऱ्यांची संख्या अत्यल्प
  • पंढरपुरात सुमारे आठशे ते एक हजार कार्यकर्ते दाखल, प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत मोजक्या कार्यकर्त्यांना नामदेव पायरीचे दर्शन घेण्यासाठी पोलिसांनी तयारी, प्रकाश आंबेडकर पोलिसांची विनंती कितपत आणि कशी मान्य करतात यावरच आंदोलनाची दिशा स्पष्ट होणार
  • विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलनासाठी अनेक कार्यकर्ते पंढरपुरात दाखल, वंचितच्या कार्यकर्त्यांना पंढरपूरमधील शिवाजी चौकात रोखले
  • प्रकाश आंबेडकर शासकीय विश्रामगृहात पोहोचले, थोड्याच वेळात जिल्हाधिकारीही शासकीय विश्रामगृहात पोहोचणार, त्यांच्याशी चर्चा झाल्यावर प्रकाश आंबेडकर आंदोलनस्थळी जाणार, विश्रामगृहात वारकरी प्रतिनिधीही हजर
  • सोलापूरमधून वंचितचे कार्यकर्ते पंढरपूरकडे रवाना, खासगी बसेस करुन कार्यकर्ते पंढरपूरच्या दिशेने
  • प्रकाश आंबेडकर मोहोळ मध्ये पोहोचले. येथून पंढरपूरकडे निघाले असून मध्ये कुठेही थांबणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here