अभिनेता सुबोध भावेला कोरोनाची लागण

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. मराठी सिनेसृष्टीतंही कोरोनाने शिरकाव केला आहे. प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आहे.
सुबोध भावे याने ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. सुबोध सोबत त्याची पत्नी मंजिरी आणि मोठा मुलगा कान्हा यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे. तर दुसरा मुलगा मल्हारला लागण झालेली नाही.
सुबोध त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो, ’मी,मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने उपचार घेत आहोत. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. गणपती बाप्पा मोरया.
सुबोधच्या या ट्विटनंतर त्याच्या फॅन्सनी तो आणि कुटुंब बरं होण्यासाठी प्रार्थना केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सुबोधने सोशल मिडियावर लहान मुलांसाठी ऑनलाईन कथा सांगण्यास सुरुवात केली आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here