विराट-अनुष्काने साजरा केला दुबईत आनंद

विशेष प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
मुंबई : स्टार कपल अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लवकरच आई-बाबा होणार आहेत. काहीच दिवसांपूर्वी या दोघांनी ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली. यानंतर आनंद वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जात आहे. दुबईत हे दोघं आपला आनंद खास लोकांसोबत साजरा करत आहेत.
विराट कोहली इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये सहभागी होण्यासाठी दुबईत गेला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलौर या संघातून विराट खेळत आहे. यावेळी त्याच्यासोबत अनुष्का देखील दुबईत गेली आहे.
यावेळी या दोघांनी केक कापून आपला आनंद साजरा केला. अनुष्काने यावेळी ब्राऊन शॉर्ट ड्रे घातला आहे. यावेळी अनुष्काच्या चेहर्‍यावर आई होण्याचा आनंद अतिशय स्पष्ट दिसत आहे. यावेळी विरुष्काने केक कापून आनंद व्यक्त केला. यावेळी खेळाडू युजवेंद्र चहलने देखील केक कापला. काही दिवसांपूर्वीच त्याने सोशल मीडियावर धनश्री वर्मासोबत साखरपुडा केल्याचा आनंद व्यक्त केला.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here