Shrigonda : घरफोडीचे सत्र थांबता थांबेना, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा तालुक्यात घरफोडीचे सत्र काही केल्याने थांबण्याचे चित्र दिसत नाही. सर्व सामान्य नागरिकांतून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहेत. त्यात आज पुन्हा तालुक्यातील टाकळी लोणार या ठिकाणी अज्ञात चोरट्याने घरफोडी करून तब्बल लाखो रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात घरफोडीच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील पांडुरंग भागवत हे शेती करून आपली उपजीविका भागवतात दि ३०आगस्टच्या रात्री १० च्या सुमारास घरातील कामे आटपून झोपी गेले असता मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घराच्या कपाटातील लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, 30 आगस्टच्या मध्यरात्री साधारण पावणेदोनच्या सुमारास फिर्यादीचे सासूबाई झोपलेल्या खोलीत अचानक कोणीतरी कपाट उचकत असल्याचे जाणवले. त्यावेळी त्यांनी डोळे उघडून पाहिले असता एक अज्ञात इसम कपाटातील सामानाची उचकपाचक करत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी हळूच सुनेच्या खोलीकडे धाव घेतली आणि हळूवारपणे पाहिलेला प्रकार सांगितलं त्यानंतर सासू सुनेने आमची कागदपत्रे नेऊ नका. त्यावर चोरटा त्यास बोलला की ‘आम्ही तुम्हाला मारणार नाही चेकबुक व कागदपत्रे नेत नाहीत. तुम्ही तुमचे कागदपत्रे सकाळी बघा. आम्ही ईथलेच आहोत. आम्ही तुम्हाला काही करणार नाही, असे बोलत कपाटातील तब्बल ३ लाख ७ हजार रुपयाचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरटयांनी लंपास केली आहे.

त्यामध्ये 80,000-00 रु.किंचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण त्यात 12 काळे मणी असलेले, दोन वाट्या, 60000=00 रु.किं.चे दिड तोळा वजनाची सोन्याची ठुसी त्यात गुलाबी रंगाचा मनी  40000-00 रु.किं.चे एक तोळा वजनाचे सोन्याचे कानातील कर्णफुले वेलीसहीत 12000=00 रु.कि.चे 3 ग्रॅम वजनाची सोन्याचे अंगठी त्यावर चौकोणी आकाराचा कलरफूल डायमंड 5000=00 रु.किं.चे दिड ग्रॅम वजनाची दोन नग सोन्याची नथ 16000-00 रु.कि.चे 04 ग्रॅम वजनाचे सोन्याचे डिझाईन असलेले कानातील टॉप्स 74000-00 रु.किं.चे 04 भार वजनाचे दोन जोड चांदीचे पैंजण , एक पैंजणाला लाल रंगाचे मणी असलेले. 80000=00 रु.कि.चे दोन तोळे वजनाची सोन्याची पानपोत त्यास बारीक गोल मणी असलेले चार पदरी, पुढे खाली दोन मोठे व दोन लहान मणी असलेले त्यास काळे मणी असलेले. 10,000=00 रु. रोख रक्कम त्यात 100 रुपये दराच्या भारतीय चलनाच्या नवीन नोटा असा एकूण 3.07,000 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी लंपास केला आहे.

याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली. त्यानंतर श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र श्वान काही अंतरावर जाऊन थांबल्याने पोलिसांना मार्ग मिळणे शक्य झाले नाही. मात्र, ऑगस्ट महिन्यात सरासरी पाहता तीन ते चार घरफोड्या झाल्या असून त्यात लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here