नालासोपाऱ्यात मध्यरात्री इमारत कोसळली…22 रहिवाशी बालंबाल बचावले..!

महाडपाठोपाठ नालासोपारा… पाच-दहा वर्षाच्या इमारती का कोसळतात? कोण करताय सामान्यांच्या जीवाशी खेळ, सरकारची भूमिका काय?

वसई: नालासोपाऱ्यात मध्यरात्री दीडच्या सुमारास माजिठीया पार्कमधील साफल्य नावाची ४ मजली इमारत अचानक कोसळली. इमारत कोसळत असल्याचे लक्षात येताच सर्व रहिवाशी तात्काळ बाहेर निघाल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. यात पाच कुटुंबातील 22 जण बालंबाल बचावले.

नालासोपारा पूर्वेकडील संकेश्वर नगर येथे साफल्य नावाची इमारत आहे. ही इमारत ११ वर्ष जुनी आहे. सोमवारी मध्यरात्री इमारतीचा काही भाग कोसळला. त्या आवाजाने इमारतीमधील रहिवासी जागे झाले आणि खबरदारी म्हणून संपूर्ण इमारत खाली करण्यात आली. मात्र अवघ्या काही वेळात म्हणजे दीडच्या सुमारास संपूर्ण इमारत कोसळली. इमारतींमधील रहिवाशी बाहेर आल्याने कुठलीही जीवित झाली नाही.

रहिवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी ही इमारत मोडकळीस आल्याने खाली करण्याची नोटीस पालिकेने दिली होती, त्यानंतर काही कुटुंब इतरत्र गेले. पाच कुटुंब तेथेच राहत होते. बिल्डरशी त्यांचा न्यायालयीन संघर्ष सुरू आहे.

‘आम्हाला आवाज आल्याने आम्ही खाली आलो आणि काही वेळेत संपूर्ण इमारत कोसळली. आमचा सारा संसार ढिगाऱ्याखाली गेला’

-दयानंद व सीमा देवरुखकर

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here