Shevgaon : बिबट्या दिसल्याने परिसरात घबराट

3

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शेवगांव तालुक्यातील मलकापूर परिसरात सोमनाथ आशोक पाटेकर यांच्या ऊसाच्या शेतात बिबट्या दिसून आला असून तर शेजारील उत्तम हरीभाऊ पाटेकर यांच्या पत्नी सायं गवत घेत आसताना त्यांना कपाशीमध्ये बिबट्या दिसून आल्याने  मलकापूर येथे एकाच ठिकाणी गेल्या पाच सहा दिवसापासून बिबट्याचा वावर आसल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण दिसून येत आहे.

मागील दोन महिन्यापूर्वी ढोरजळगांंवने परिसरात लपण्यासाठी ऊसाचे फड असल्यामुळे ब-याच दिवस बिबट्याचे वास्तव्य होते. कित्येक ठिकाणी शेळ्या फस्त केल्या होत्या. मात्र, मलकापूर परिसरात ज्या भागात ऊसाचे क्षेत्र कमी असतानाही बिबट्या वावर होत असून चितेंचा विषय बनला आहे. सध्या वन्य प्राण्यांना भक्ष नसल्याने भटकंती करताना वेळ साधून पाळीव प्राणी मनुष्यावर हल्ला चढवत आहे.

वनविभागाचे दूर्लक्ष

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी परीसरातील ठशांची पाहणी केली असता ते ठसे बिबट्याच्या पायांची असल्याचे सिद्ध झाले. असे असतानाही पाच दिवस उलटूनही पिंजरा लावण्याची दक्षता वनविभागाने घेतली नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. एखादी दुदैवी घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ग्रामस्थांनी बिबट्याच्या वावर लक्षात घेता ऊस शेतात एकट्याने जाऊ नये. तसेच लहान बालकांची काळजी घ्यावी. ऊस, बाजरी, कपाशी पिके मोठी वाढली असून योग्य दक्षता घेऊन काम करण्याचे अवाहन करण्यात आले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here