Sangamner : पहिल्यांदाच गणरायाला शांततेत निरोप

3

गणेश मूर्ती नदी पत्रात क्रेनच्या सहाय्याने विसर्जित

प्रतिनिधी | विकास वाव्हळ | राष्ट्र सह्याद्री 

ना सनई चौघडा, ना बँड, ना ढोल ताशा, ना डी.जे, ना घोषणाबाजी, ना गुलालाची अथवा फुलांच्या पानाची उधळण फक्त गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या एवढ्याच घोषणा देत आज गणपती बाप्पाच्या मूर्तींचे  विसर्जन करण्यात आले अतिशय शांततेत, नियमांचे काटेकोरपणे पालन करत संगमनेरकरांनी गणेशाला भावपूर्ण निरोप दिला व पुढच्या वर्षी लवकर या,असे निमंत्रण द्यायला मात्र संगमनेर कर विसरले नाहीत.

ना भूतो ना भविष्य आशा अतिशय काटेकोरपणे नियमांचे पालन करत शांततेत गणरायाला निरोप देताना संगमनेरकर आज भावूक झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. कोठेही उत्साह दिसत नव्हता. आज सकाळी शहरातील सोमेश्वर रंगार गल्ली येथील मानाच्या पहिला गणपतीची आरती संगमनेरचे लोकप्रतिनिधी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सोशल डिस्टन्सचे पालन करून करण्यात आली.याप्रसंगी आमदार डाॅ सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, माजी नगरसेवक जयवंत पवार, मुकुंद गरूडकर, नगरसेवक किशोर पवार, नितीन अभंग, किशोर टोकसे, शैलेश कलंत्री, गोविंद नालकर, ज्ञानेश्वर काजळे, प्रांताधिकारी डॉ शशिकांत मंगरूळे, आदिंसह प्रशासकीय अधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता तरुणाईची आवडती अशी गणेश विसर्जन मिरवणुक एकाही मंडळाने यावर्षी वाजत गाजत काढली नाही यावर्षी प्रवरा नदीला ही मोठ्या प्रमाणात पाणी असून ही नदी पत्रात गणेश भक्तांना गणेशाचे विसर्जन करण्यास प्रशासनाने बंदी घातली होती त्यामुळे गणेश भक्तांच्या नाराजीत अधिकच भर पडली होती.

नगर पालिकेने शहरात विविध ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जनासाठी  कृत्रिम हैद तयार केले होते तसेच जवळच गणेश मूर्ती दान करण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली होती तर जयहिंद व एकविरा फाउंडेशन यांनी फिरता कृत्रिम हैद तयार करून तो शहरात फिरून गणेश मूर्तीचे त्यात विसर्जन केले तर अनेक भक्तांनी आपल्या गणेश मूर्ती या कार्यकर्त्यांकडे नदीपात्रात विसर्जन करण्यासाठी दिल्या तर येथील काही उत्साही कार्यकर्त्यांनी तर गणेश मूर्ती नदी पत्रात क्रेनच्या सहाय्याने विसर्जित केल्या तसेच येथील विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी प्रवरा नदी पात्रात पहिल्याच घाटावर गणेश मूर्ती विसर्जनाची जय्यत तयारी केली होती. या ठिकाणी त्यांनी सोशल डिस्टन्सचे पालन करत गणपती विसर्जनासाठी वाहात्या पाण्यात कृत्रिम बोटीचा वापर करून चार ब्राम्हणाच्या हस्ते विधिवत पूजा करून या गणेश मूर्ती बोटीतून नदी पत्रात मधोमध नेऊन या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येत होते. त्यामुळे अनेक गणेश भक्तांनी या उपक्रमाचे स्वागत करत थेट प्रवरा नदी काठ गाठत तेथे जाऊन या युवकांच्या हस्ते गणेश मूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन केले.

प्रशासनाने नदी पत्रात सर्व बाजूने पत्रे लावून बंद केल्या होत्या त्यामुळे कोणास ही थेट नदी पत्रात जाऊन गणेश मूर्ती विसर्जन करता येत नव्हते. याप्रसंगी पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

यावर्षी गणेश विसर्जन मिरवणुक नसल्याने अनेकांचा रोजगार बुडाला त्यात वाजंत्री वाले  हातगाडी वरील छोटे व्यापारी, सुशोभीकरण करणारे कारागीर, बँड, ढोल ताशा, गुलाल, फुले  आधी अनेक  नागरीकांचा रोजगार बुडाला त्यामुळे  त्यांनी नाराजी व्यक्त केली.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here