Kada : खाकीतल्या सलीमभाईंनी गुंफला सद्भावनेचा पवित्र धागा

गणपती बाप्पाची आरती करुन दिला एकतेचा संदेश
प्रतिनिधी | राजेेंद्र जैन | राष्ट्र सह्याद्री 
स्वधर्माचा आदर करतानाच, इतर धर्माचाही आदर कसा करायचा याचं उत्तम उदाहरण म्हणजे एपीआय सलीम पठाण आहेत. गणेश विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करुन खाकी वर्दीतल्या एका सलीमभाईंनी सदभावनेचा पवित्र धागा गुंफून सामाजिक एकतेचा संदेश दिला आहे.
भारत हा विविधतेने नटलेला जगाच्या पाठीवरचा एकमेव देश आहे. ज्या देशात सर्व धर्मीय बांधव एकमेकांच्या पवित्र धर्माचा आदर करताना दिसतात. रमझान ईद असो की दीपोत्सव सर्वच राष्ट्रीय सण, उत्सव हिंदू, मुस्लिम बांधव एकत्रित येऊन उत्सवात सहभागी होतात. अन् त्या उत्सवाचा आनंद अजूनच व्दिगुणीत करताना पाहावयास मिळतात. सर्वधर्म समभावाची जोपासना फक्त भारतातच पाहावयास मिळते. ईश्वर, अल्ला एकच आहेत.

त्यामुळे मानवता हाच खरा सर्वश्रेष्ठ धर्म समजून कडा पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरिक्षक सलीम पठाण यांनी हिंदू धर्मियांची आराध्य दैवता गणरायाच्या निरोपाच्या दहाव्या दिवशी पठाण यांनी स्वधर्माचं पालन करतानाच, इतर धर्मियांचा आदर कसा करतात, हे दाखवून दिले. स्वत: मुस्लिम धर्मिय असूनही श्री. गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करुन एकतेचा अनोखा संदेश दिला आहे. कडेकरांची वर्षानुवर्षे अखंड चालत आलेली एकतेची परंपरा खाकी वर्दीतल्या सलीमभाईंनी कायम ठेवत, सार्वजनिक गणेशोत्सवात सद्भावनेचा पवित्र धागा गुंफुन सामाजिक एकतेचा संदेश दिला आहे.
मानवता हाच खरा धर्म आहे. त्यामुळे मानवाने प्रत्येक धर्माचा आदर केला पाहिजे. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं. हीच सगळ्या धर्मांची शिकवण आहे.
– सलीम पठाण, एपीआय कडा

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here