असंवेदनशीलता : पत्रकार रायकर यांच्या मृत्यूवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया देणे टाळले

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. पुण्याचे पालकमंत्री म्हणून पत्रकार अजित पवार यांना पांडुरंग रायकर यांच्याबाबत प्रश्न विचारत राहिले, मात्र काही मिनिटं थांबून प्रतिक्रिया देण्याची तसदीही त्यांनी घेतली नाही.

टीव्ही 9 मराठीचे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं आज (2 सप्टेंबर) सकाळी कोरोनामुळे निधन झालं. ते 42 वर्षांचे होते. पुण्यासारख्या शहरात आपल्या शांत आणि संयमी पत्रकारितेने त्यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील असलेले पांडुरंग रायकर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here