Shrirampur : मुठेवाडगाव येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायाची संधी

प्रतिनिधी |संदीप आसने | राष्ट्र सह्याद्री
 
श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव येथे सुशिक्षित बेरोजगारांसाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ३१ गाळ्यांचे व्यापारी संकुल उभारण्यात येत असून, यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे या संधीचे सुशिक्षित बेरोजगारांनी सोने करावे असे आवाहन, माजी उपसरपंच व बाजार समितीचे संचालक विश्वनाथ मुठे यांनी केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून गावातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची ग्रामपंचायतीकडे गाळे देण्याची मागणी होती. मागील निवडणुकीमध्ये विश्वनाथ मुठे यांनी ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. काल दि.२९ ऑगस्ट रोजी मुठेवाडगाव ग्रामपंचायतीची मुदत संपली असून या ठिकाणी सोमवार दि.३१ रोजी प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. मात्र, ही मुदत संपण्या अगोदरच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बेरोजगारांना ३१ गाळ्यांचे व्यापारी संकुल मुठेवाडगाव येथे उभारण्याच्या तयारीस सुरुवात करण्यात आली असून, हे व्यापारी संकुल झाल्यानंतर याठिकाणी तरुणांनी आपला उद्योग व्यवसाय करून आपल्याला ग्रामपंचायतीने गाळ्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या संधीचे सोने करावे असे, आवाहन श्रीरामपूर बाजार समितीचे संचालक विश्वनाथ मुठे यांनी केले आहे.

मुठेवाडगाव ग्रामपंचायतीने मागील ५ वर्षाच्या कालावधीत गावात पेव्हिंग ब्लॉक रस्ते, सिमेंट काँक्रीटचे रस्ते, गावाला पिण्याच्या पाण्यासाठी धोंडीबा पाझर तलावापासून गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून ८० लक्ष रुपये किंमतीची पाणी पुरवठा योजना यासह आदी विविध विकास कामे पूर्णत्वास नेली आहेत. या विकास कामांसाठी सरपंच पार्वतीबाई मुठे, उपसरपंच विश्वनाथ मुठे, ग्रामसेवक सुधीर उंडे व सर्व सदस्य यांचे मोलाचे योगदान लाभले.

वचनपूर्ती केल्याची गावात चर्चा
मुठेवाडगाव ग्रामपंचायतीने गावात विविध कामे पूर्णत्वास नेत असतानाच सुशिक्षित बेरोजगारांना देखील गाळ्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन दिल्याने तसेच गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम देखील पूर्णत्वास आल्याने गावातील तरुणांमध्ये विश्वनाथ मुठे यांनी वचनपूर्ती केल्याची चर्चा सुरू होती.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here