आणखी 20 क्रीडा प्रकारातील खेळाडूंना मिळणार सरकारी नोकरी

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारनं मंगळवारी खेळाडूंना मोठं गिफ्ट दिलं. केंद्रीय कामगार मंत्रालयानं जाहीर केलेल्या आदेशानुसार आता ’सी’ स्तरावरील सरकारी नोकरीसाठी खेळाडूंच्या थेट भरतीसाठी रस्सीखेच, मल्लखांब आणि पॅरा क्रीडा आदी 20 खेळांचा यादीत समावेश करण्यात आला आहे. केंद्राची मान्यता असलेल्या क्रीडा विभागातर्फे भारत सरकारच्या विभागातील सी गटातील नोकरभरतीसाठीच्या 43 खेळांच्या यादीत आणखी काही खेळांचा समावेश केला आहे.
कामगार मंत्रालयानं आदेशात म्हटलं की,”क्रीडा विभागानं केलेल्या शिफारशी मान्य करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार आता 63 क्रीडा प्रकारातील नैपुण्यवान खेळाडू सी गटाच्या पदासाठीच्या नियुक्तीसाठी पात्र ठरणार आहेत. ज्या खेळाडूंना राष्ट्रीय शारीरिक प्रशिक्षण अभियानांतर्गत राष्ट्रीय पुरस्कानानं गौरविण्यात आले, तेही खेळाडू या पदांसाठी पात्र ठरतील.
आधी हे खेळाडू ठरत होते नियुक्तीस पात्र
तिरंदाजी, अ‍ॅथलेटिक्स, आट्या-पाट्या, बॅडमिंटन, बॉल-बॅडमिंटन, बास्केटबॉल, बिलियर्ड्स अन् स्नूकर, बॉक्सिंग, ब्रिज, कॅरम, बुद्धीबळ, क्रिकेट, सायकलिंग, घोडेस्वारी, फुटबॉल, गोल्फ, जिमनॅस्टीक्स, हँडबॉल, हॉकी, आईस-स्कीईंग, आईस-हॉकी, आईस-स्केटिंग आणि ज्युदो, कबड्डी, कराटे-डो, कयाकिंग आणि केनोईंग, खो-खो, पोलो, पॉवरलिफ्टिंग, रायफल नेमबाजी, रोलर स्केटिंग, नौकानयन, सॉफ्ट बॉल, स्क्वॉश, जलतरण, टेबल टेनिस, तायक्वांदो, टेनी-कोईट, टेनिस, व्हॉलिबॉल, भारोत्तोलन, कुस्ती, याचिंग.
नव्यानं समावेश केलेले खेळ
बेसबॉल, रग्बी, बास्केटबॉल, टग-ऑफ-वॉर, मल्लखांब, पॅरा स्पोर्ट्स ( पॅरा ऑलिम्पिक आणि पॅरा आशियाई स्पर्धा) सह 20 खेळांडा समावेश केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here