Aurangabad : धार्मिक स्थळे न उघडल्यास राज्यभर आंदोलन – खासदार सय्यद इम्तियाज जलील

2

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

गेल्या चार ते पाच महिन्यापासून लॉकडाऊन सुरू असल्यामुळे राज्यातील सर्व मंदिर-मस्जिद-गुरूद्वारा-चर्च आदी धार्मिक स्थळे बंद आहेत. राज्यशासनाने लवकरात लवकर सर्व धर्मियांची धार्मिक स्थळे न उघडल्यास राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा औरंगाबादचे खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी बुधवारी (दि.२) दिला आहे.

औरंगाबाद शहरातील आणि जिल्ह्यातील धार्मिक स्थळे सुरू करा प्रशासनाने सुरू करावीत, असे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले होते. मंगळवारी खासदार इम्तियाज जलील यांनी खडकेश्वर येथील शिवमंदिर उघडण्यासाठी निवेदन देण्यासाठी जाणार होते. परंतु नंतर त्यांनी आपले आंदोलन स्थगित केली होते. बुधवारी दुपारी १ वाजता शहरातील शहागंज परिसरात असलेल्या मस्जीद ए कलामध्ये ते आपल्या कार्यकर्त्यांसह नमाज अदा करण्यासाठी जाणार होते.

परंतु त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांना समज देऊन नंतर सोडून देण्यात आले. त्यावेळी आंदोलन स्थगित केले होते. बुधवारी दुपारी १ वाजता शहरातील शहागंज परिसरात असलेल्या मस्जीद ए कलामध्ये ते आपल्या कार्यकर्त्यांसह नमाज अदा करण्यासाठी जाणार होते. परंतु त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांना समज देऊन नंतर सोडून देण्यात आले.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here