वाराणसीच्या घाटावरील 350 कुटुंबांना सोनू सूदची मदत

0

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
वाराणसी : अभिनेता सोनू सूदने आधी सर्व मजुरांना घरी पोहोचवण्याचं काम केलं. पण त्यानंतर सोनू सूद प्रत्येक गरजूला मदत करताना दिसत आहे.
मार्च महिन्यापासून सुरू असलेली टाळेबंदीनंतर सध्या अनलॉकनुसार सर्व गोष्टी हळूहळू उघडत आहे. त्यातच काशीतील नावाडींसाठी कमाईची संधी होती. पण गंगाला पूर आल्याने स्थानिक जिल्हा प्रशासनाने 15 सप्टेंबरपर्यंत नौकाविहार करण्यास बंदी घातली आहे.
सध्या काशीतील ही समस्या पाहता तेथील सामाजिक कार्यकर्ते दिव्यांशु उपाध्याय यांनी सोनू सूद यांना टॅग करून सर्व माहिती सोशल मीडियाद्वारे दिली. वाराणसीत 84 घाट असून 350 नावाडी कुंटुंब आहेत.
आता त्यांना आणि त्यांच्या मुलांना उपाशीच झोपावं लागेल, अशी माहिती त्यांनी ट्विट करून दिली होती. या ट्विटला सोनू सूद यांनी उत्तर दिलंय. वाराणसीच्या घाटावरील 350 कुटुंबातील कोणताही सदस्य उपाशी झोपणार नाही. आज मदत पोहोचेल, असं सोनू म्हणाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here