काजोल देश सोडण्याच्या तयारीत

मुलीसाठी सिंगापूरला राहण्याचा घेतला निर्णय
विशेष प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
मुंबई : कोरोना विषाणूच कहर जगभरात दिसत असून सामान्य लोकांपासून व्हीआयपी लोकांपर्यंत सर्वच याच्या कचाट्यात सापडले आहेत. यामुळे अनेक जण घरात बंदिस्त झाले आहेत. बॉलिवूड कलाकारही विदेशात शिक्षण घेणार्‍या मुलांच्या आरोग्याबाबत चिंतीत दिसताहेत.
अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांनाही मुलगी न्यासा हिची चिंता सतावत आहे. न्यासा सिंगापूरला शिक्षण घेत असून सध्या हिंदुस्थानमध्ये आहे. मात्र मुलीखातर अजय देवगण आणि पत्नी काजोल यांनी मोठा निर्णय तिला एकटीला सिंगापूरला पाठवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. न्यासासोबत अभिनेत्री काजोल देखील सिंगापूरला जाणार आहे.
वृत्तानुसार, कोरोना संकटकाळामुळे काजोल मुलीला सिंगापूरला एकटी धाडण्यास उत्सुक नाही. मुलीचया शिक्षणावर कोणताही परिणाम होऊन नये यामुळे तिने काही काळासाठी हिंदुस्थान सोडून मुलीसोबत सिंगापूरला जाण्याचा निर्णय घेतला आहे. काजोल मुलीसोबत सिंगापूर तर अजय देवगण मुलासोबत मुंबईत राहणार आहे.
दरम्यान, अजय आणि काजोलची मुलगी न्यासा सिंगापूरच्या ’युनाइटेड वर्ल्ड कॉलेज ऑफ साउथ ईस्ट एशिया’मध्ये शिक्षण घेत आहे. मुलीला कोणताही त्रास होऊ नये यासाठी अजय देवगणने सिंगापूरमध्ये 2018 ला एक फ्लॅट देखील घेतला होता. याच फ्लॅटमध्ये आता काजोल आणि न्यासा राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here