Sangamner : कोरोना विषाणूंचा धुमाकूळ; काल एक जण मृत तर 42 जणांना बाधा…

संगमनेरात एकूण रुग्ण संख्या 1762 वर पोहचली…

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री | विकास वाव्हळ

संगमनेरमध्ये कोरोना विषाणूंनी धुमाकूळ घातला असून काल गणेश विसर्जनच्या  सायंकाळ नंतर शहरातील माळीवाडा परिसरात 70 वर्षीय व्यक्तीचा मृत्यूची बातमी येऊन धडकली. त्यानंतर काही तासाच्या अंतराने 42 जण बाधित असल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला. त्यामुळे संगमनेरमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्याची बाधित रुग्ण संख्येत 42 ने वाढून एकूण रुग्णसंख्या 1762 वर जाऊन पोहोचली आहे. तर मृतांची संख्या 27 वर पोहचली आहे.

काल सायंकाळी शासकीय व खासगी प्रयोगशाळेकडून 42 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शहरातील इंदिरानगर 33 वर्षीय महिला, माळीवाडा परिसर 51 वर्षीय व्यक्ती, तालुक्यातील कनोली 60 व 46 वर्षीय व्यक्ती, घुलेवाडी 38 वर्षीय महिला, रहिमपूर 02 व 04 वर्षीय मुले व 06 वर्षीय मुलगी, 60, 38, 34 वर्षीय व्यक्ती, ढोलेवाडी54 वर्षीय महिला, कौठे धांदरफळ 91 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीसह 62, 34, 33 व 27 वर्षीय व्यक्तीसह 55, 33, 23 व 22 वर्षीय महिला, 06 वर्षीय मुलगा, कुरकुटवाडी 61 वर्षीय व्यक्ती, वाघापूर 55 वर्षीय व्यक्ती, शहरातील साईबन कॉलनी 52 वर्षीय महिला व 30 वर्षीय तरुण, कुंभार आळा 30 वर्षीय तरुण, गोविंद नगर 36 वर्षीय तरुण, मालदाडरोड 52 व 37 वर्षीय महिला, शिवाजीनगर 31 वर्षीय महिला, नाईकवाडपुरा 51 वर्षीय व्यक्ती, बाजारपेठ 52 वर्षीय व्यक्ती,

तसेच तालुक्यातील घारगाव 61 वर्षीय पुरुष, माळेगाव पठार 33 वर्षीय तरुण, पिंपरणे 24 वर्षीय तरुण, कोल्हेवाडी 67 वर्षीय पुरुष, धांदरफळ 32 वर्षीय तरुण, दाढ खुर्द 53 वर्षीय व्यक्ती, वडगाव पान 43 वर्षीय व्यक्ती, जाखोरी 59 वर्षीय व्यक्ती व चिंचोली गुरव 52 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधित रुग्णसंख्येत 42 रुग्णांची भर पडल्याने तालुक्याची रुग्णसंख्या अठराव्या शतकाच्या दिशेने अग्रेसर होत 1762 वर जाऊन पोहोचली आहे.

संगमनेरमध्ये दिवसागणित कोरोना बाधित रुग्ण वाढत चालली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर अनेकांनी कोरोना धसका घेतल्याचे दिसत आहे. प्रशासन देखील काळजी घेण्याचे आवाहन करत आहे. तरी देखील संख्या दररोजच वाढत आहे. त्यामुळे या वाढीचे निश्चित कारण प्रशासनाने शोधून काढावे, अशी मतही नागरिकांनी व्यक्त केले आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here