मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार हे जनतेला आवडलं की नाही?

8

याचा आता मी शोध घेणार ः खडसे
प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
जळगाव : भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा स्वपक्षीय नेत्यांवर नाव न घेता हल्ला चढवला आहे. दहा-पंधरा वर्षांपूर्वी पक्षात उदयाला आलेले नेते आता आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत, अशा शब्दांत खडसेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. आपल्या 68 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन, अशी घोषणा दिली होती. त्यावरूनही खडसेंनी फडणवीस यांना टोला लगावला. ‘मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार हे जनतेला आवडलं की नाही याचा आता मी शोध घेणार, असल्याचं म्हणत खडसेंनी फडणवीस यांना नाव न घेता लक्ष्य केलं.
‘एकेकाळी पक्षाला प्रतिकूल परिस्थिती असतानाही गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, नितीन गडकरी, गिरीश बापट, सुधीर मुनगंटीवार आणि मी अशा सर्व नेत्यांनी अतिशय कष्ट घेऊन पक्ष उभारणी केली होती. मागच्या वेळेस तर युती नसतानाही एक हाती सत्ता राज्यात मिळाली होती. आता केंद्रात आपलं सरकार होतं. राज्यात अनुकूल परिस्थिती होती. मात्र या अशा नेत्यांमुळे सर्व वातावरण अनुकूल असतानाही पक्षाला सत्ता गमवावी लागली आहे,’ अशा शब्दांत खडसेंनी स्वपक्षातल्या काही नेत्यांना लक्ष्य केलं.

8 COMMENTS

 1. Appreciating the time and energy you put into your blog
  and detailed information you offer. It’s nice to come across a blog every once in a while
  that isn’t the same out of date rehashed material. Great read!
  I’ve bookmarked your site and I’m adding your RSS feeds to
  my Google account.

 2. I do not know whether it’s just me or if everyone else encountering
  problems with your website. It appears as though some of the text in your posts
  are running off the screen. Can somebody else please provide
  feedback and let me know if this is happening to them as well?
  This may be a issue with my web browser because I’ve had this happen previously.
  Kudos

 3. Magnificent beat ! I wish to apprentice while you amend your site, how can i subscribe for a blog
  website? The account aided me a acceptable deal.

  I had been a little bit acquainted of this your broadcast provided bright clear idea

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here