Shrigonda : तालुक्यातील ढोरजा या ठिकाणी आढळले पुरातन अवशेष; जिवंत समाधीच्या खुणा

बघ्यांची गर्दी
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

गावातील श्रावणबाबा समाधी मंदिर स्थळाजवळ दहा फूट अंतरावर आज चौथऱ्याच्या बाजूला काही लोकांना सांगाड्याची हाडे व हाडांजवळ पुरातन मातीची भांडे, टाळ, पूजेचा एक तांब्या, एक चमचा, लाकडी चिपळ्या या वस्तू मिळून आल्या आहेत.  
प्रथमदर्शनी पाहणाऱ्या लोकांनी याबाबत ग्रामस्थांना माहिती दिली असून श्रावणबाबांच्या एखाद्या शिष्याची ही समाधी असण्याची श्यक्यता ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. बेलवंडी पोलिसांनी देखील या माहितीला दुजोरा दिला असून पोलीस घटनास्थळी गेले आहेत जिवंत समाधीच्या खुणा मिळून आल्यामुळे घटनास्थळी बघ्यांची गर्दी होत आहे.
हाडे तपासणीसाठी पाठवणार – बेलवंडी पोलीस निरीक्षक अरविंद माने

ढोरजा गावात हाड, काही पितळी भांडी  सापडली आहेत. चौथऱ्याजवळ खोदकाम करताना समाधीस्थळाच्या बाजूला ही हाड मिळून आल्यामुळे ही समधीच असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. सदर हाडे ही तपासणीसाठी पाठवली जाणार आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here