IPS अधिका-यांच्या बदल्या : विश्वास नांगरे पाटील यांच्यासह बहुचर्चित अधिका-यांच्या बदल्या

कोल्हापूरच्या महानिरीक्षकपदी मनोजकूमार लोहिया

प्रतिनिधी | आनिल पाटील | कोल्हापूर | राष्ट्र सह्याद्री  

अनेक दिवसांपासून चर्चा सुरु असलेल्या बदल्यांबाबत आता पूर्णविराम मिळाला आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (कायदा व सुव्यवस्था) आणि मिलिंद भारंबे (गुन्हे) यांची मुंबईच्या सहआयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी दीपक पांडे यांना संधी देण्यात आली आहे. मनोजकुमार लोहिया यांच्याकडे कोल्हापूर महानिरीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रताप दिघावकर यांची नियुक्ती नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक म्हणून झाली आहे. नाशिकचे महानिरीक्षक चेरिंग दोर्जे यांची तुरुंग महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे.

बहुचर्चित बदल्यांचा आदेश जारी

पोलिस दलातील बहुचर्चित बदल्यांचा आदेश जारी झाला असून विनयकुमार चौबे यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक) येथे नियुक्ती झाली आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणून के. व्यंकटेशम आणि ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांना आहे तेथेच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या दोन प्रमुख शहरांत नवे पोलिस आयुक्त येणार नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here