कविता : फू बाई फू फुगडी फू कधी जाशील, कोरोना तू रं कोरोना तू

फू बाई फू फुगडी फू
मेल्या कधी जाशील, कोरोना तू रं कोरोना तू IIधृ॥

आज बंद उद्या बंद, बंद किती बंद
आज बंद उद्या बंद, बंद किती बंद
कारण नसताना बाहेर फिरतात
ते सगळे मंद
आत्ता फुगडी फू
फू बाई फू फुगडी फू
मेल्या कधि जाशील, कोरोना तू रं कोरोना तू ॥१॥

ताई नाही माई नाही, कोणी नाही भेटत
ताई नाही माई नाही, कोणी नाही भेटत
लॉक डाऊनचे दिवस म्हणे, चालले आहेत रेटत
आत्ता फुगडी फू
फू बाई फू फुगडी फू
मेल्या कधी जाशील, कोरोना तू रं कोरोना तू ॥२॥

काम ना धंदा, आता जेवण तीन-तीनदा
टीव्ही वर ज्ञानदा आणि भांडी घासा चारदा
नुसता हाच उरलाय धंदा
आत्ता फूगडी फू
फू बाई फू फूगडी फू
मेल्या कधी जाशील, कोरोना तू रं कोरोना तू ॥३॥

कवी – श्री. दामोधर विमल राजाराम डहाळे (स.शि.)
जि. प. पूर्व माध्य. शाळा, मांडवी
ता. – तुमसर, जि.- भंडारा
मो. ९६५७६७९९९७

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here