Varanasi : गंगेचे महाविक्राळ रुप : स्मशानभूमीत पाणी घुसल्याने घराच्या छतांवर अंत्यविधीची वेळ

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

वाराणसीत गंगा नदीला मोठा पूर आला असून गंगेने महाविक्राळ रूप धारण केले आहे. स्मशान भूमीत पाणी घुसल्याने घराच्या छतांवर अंत्यविधी करण्याची वेळ वाराणसीकरांवर येऊन ठेपलीय.

वाराणसीच्या काठावर रोज 60 ते 70 मृतदेह अग्नी देण्यासाठी आणले जातात, मात्र सध्या आलेल्या भीषण पुरामुळे अनेक लोकांना वाट पाहात ताटकळत उभे राहावं लागत आहे (Varanasi Ganga River Flood).

जौनपूर, भदोही, मिर्जापूर, गाजीपूर, सोनभद्र, बलिया, गोरखपूर, पूर्वांचल अशा आसपासच्या अनेक जिल्ह्यातून लोक दशाश्वमेध घाटावर येऊन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत असतात. मात्र नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे हे करणं अशक्य झालं आहे. त्यामुळे जिथे मोकळी जागा मिळेल तिथे अनेक मृतदेहांना अग्नी दिला जात आहे, तर अनेकांनी घरांच्या छतावरच मृतांना अग्नी देण्यास सुरूवात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here