Hyundai Creta : लॉकडाऊनमध्येही हुंडाईच्या क्रेटा गाडीची क्रेझ, 55,000 चे विक्रमी बुकिंग

डिझेल मॉडेलला अधिक मागणी, 60 टक्क्यांपेक्षा जास्त बुकिंग

लॉकडाऊनच्या काळातही हुंडाईच्या नवीन क्रेटा गाडीची क्रेझ पाहायला मिळत आहे. लॉकडाऊन काळात आतापर्यंत 55 हजारांच्या बुकिंगचा आकडा क्रेटा गाडीने ओलांडलाय. 

Hyundai ने 16 मार्च 2020 मध्ये हे नवीन क्रेटा गाडी लाँच केली. त्यानंतर लगेचच लॉकडाऊन झाले. मात्र, लॉकडाऊन काळातही ह्युडांईच्या या नवीन क्रेटा गाडीने अनेकांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. क्रेटाच्या डिझेल मॉडेलला अधिक मागणी असून 60 टक्क्यांपेक्षा जास्त बुकिंग डिझेल मॉडेलसाठी झाले आहे.

नवीन क्रेटाचा लूक बदलला

नवीन क्रेटाच्या लूकमध्ये बदल करण्यात आला आहे. त्याशिवाय क्रेटाचे अनेक फीचर्सही अपडेट करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना क्रेटा पहिल्याच नजरेत पसंत पडत आहे. नवीन क्रेटा एसयुव्ही 5 इंजिन-गिअरबॉक्स कॉम्बिनेशन आणि 5 व्हेरिअंट लेव्हलमध्ये उपलब्ध आहे (Hyundai Creta Bookings Cross 55000).

क्रेटाच्या बेस मॉडलची एक्स शोरुम किंमत 9.99 लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची किंमत 17.20 लाख रुपये आहे. नवीन क्रेटाच्या डिझेल इंजिनमध्ये 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटेमॅटिक गिअरबॉक्स मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here