आमदार सुरेश धस यांनी पीक कर्ज मंजूर न करणा-या बँक मॅनेजरचे धुतले पाय

सोशल मीडियावर धस यांच्या गांधीगिरीचा व्हिडिओ व्हायरल 

आमदार सुरेश धस यांनी एका बँक मॅनेजरला घरी बोलावून पाय धुवून उपरणे घातले, असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हरी नारायण असे या बँक मॅनेजरचे नाव असून बीडच्या आष्टी तालुक्यातील एसबीआयच्या शाखेचे ते मॅनेजर आहे. पीक कर्जाच्या मंजूर न केल्यामुळे आपण ‘मुन्नाभाई’ प्रमाणे गांधीगिरी करीत मॅनेजरची समजूत घातली आहे, असे आमदार धस यांनी म्हटले आहे.

या बँक मॅनेजरला धस यांनी स्वतःच्या घरी बोलावले. त्याचे विधीवत पाय धुतले. नंतर उपरणे घालून व फुलांचा वर्षावही केला. सोबतच संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचे मॅनेजर मिळावे, असं उपरोधिक वक्तव्य धस यांनी केलं. त्याचबरोबर आष्टीतील शेतकऱ्यांनीदेखील अशीच पूजा करावी, असंदेखील ते व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here