Shrigonda : तालुका खादी ग्रामोद्योग संघ नाहाटा यांच्या ताब्यात

अध्यक्षपदी घाडगे उपाध्यक्षपदी शेख 

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा तालुका खादी ग्रामोद्योग संघाच्या अध्यक्षपदी बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांचे खंदे समर्थक शुभम घाडगे तर उपाध्यक्षपदी रज्जाकभाई शेख यांनी बाजी मारली आहे. बाळासाहेब नाहाटा यांना वाढदिवसाच्या निमित्ताने ही खादी ग्रामोद्योग संघांमधील कार्यकर्त्यांनी भेट दिली. 
त्यामुळे साडेसात वर्षानंतर नाहाटा गटाचा खादी ग्रामोद्योग संघावर झेंडा फडकला आहे. अडीच वर्षापूर्वी झालेल्या झालेल्या निवडणुकीत अकरापैकी नाहाटा गटाला अवघी एक जागा मिळाली होती.
गेल्या महिन्यात संघाचे अध्यक्ष नंदकुमार ससाणे उपाध्यक्ष निवृत्ती कोकाटे यांनी राजीनामा दिला होता. या संधीचा बाळासाहेब नाहाटा यांनी फायदा उठविला सत्ताधारी गटाचे नंदकुमार ससाणे बापू कसबे विठ्ठल माने शुभम घाडगे रज्जाकभाई शेख हे सदस्य फोडले. अध्यक्षपदासाठी मनोज घाडगे यांना सहा तर संध्या ससाणे यांना पाच मते मिळाली   तर उपाध्यक्षपदाच्या निवडीत रज्जाकभाई शेख यांना सहा तर संजय शिंदे यांना पाच मते मिळाली.
संघाच्या या राजकिय उलथापालथीत संघाचे माजी अध्यक्ष भगवानराव राष्ट्रीय जनता दलाचे महासचिव रफीक इनामदार सत्यवान शिंदे आबासाहेब तोरडमल कांतीलाल कोकाटे मनोज घाडगे संतोष गोरखे सदिकभाई शेख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here