Aurangabad : बंदपत्रित अधिपरिचारिकांच्या परीक्षाचा निकाल जाहीर करा

औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

औरंगाबाद : बंदपत्रित अधिपरिचारिकांना (स्टाफ नर्स) यांना परीक्षा देण्याची परवानगी आरोग्य विभागाने नाकारली होती. या निर्णाया विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठात धाव घेतली असता खंडपीठाने परीक्षा घेण्याचे अंतरिम आदेश गुरूवारी (दि.३) दिले. राज्यातील औरंगाबाद आणि लातूर विभाग वगळून तर सर्व विभागाचा निकाल जाहिर केल्यामुळे खंडपीठाने नाराजी व्यक्त करत शुक्रवारपर्यंत (दि.४) निकाल जाहीर करावा किंवा राष्ट्रीय अभियान आरोग्य आयुक्त यांनी व्यक्तीशः हजर रहावे. निकाल जाहीर का करण्यात आला नाही याचा खुलासा करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले.

शेख रोशनबी चाँदपाशा यांच्यासह ६४ परिचारिकांनी अॅड सिद्धेश्वर ठोंबरे यांच्या मार्फत खंडपीठात धाव घेतली होती. बंदपत्रित अधिपरिचारिका गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहेत. महाराष्ट्र नर्सिंग नियम २०१५ नुसार सेवा नियमित करण्यासाठी २८ जून २०१९ रोजी शासन निर्णय काढण्यात आला, १५ एप्रिल २०१५ पासून शासन सेवेत असलेल्या परिचारिकांना लेखी परीक्षा दिल्यानंतरच सेवेत कायम करता येईल.

औरंगाबाद आणि लातूर आरोग्य विभागातील परिचारिकांना २२ सप्टेंबर २०१९ रोजी मोबाईल वर टेस्ट मॅसेजद्वारे परीक्षाला बसता येणार नाही, असे कळविले होते. खंडपीठाने सुट्टीच्या दिवशी सुनावणी घेऊन परिक्षाला बसू देण्याचे अंतरिम आदेश दिले. सदर याचिका प्रलंबित असताना आरोग्य विभागाने औरंगाबाद आणि लातुर विभाग वगळता २७ आँगस्ट रोजी निकाल जाहीर केला. सदर याचिका न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांच्या समोर सुनावणीस निघाली असता खंडपीठाने याची गंभीर दखल घेत नाराजी व्यक्त केली.

४ सप्टेंबरपर्यंत निकाल जाहीर करावा, निकाल जाहीर का केला नाही याचा खुलासा करावा किंवा शुक्रवारी व्यक्तिशा खंडपीठात हजर रहावे, असे आदेशात नमूद केले. या याचिकेवर पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे. सरकार पक्षाच्या वतीने अँड. एस.बी. यावलकर हे काम पाहत आहेत.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here