Ahmadnagar : आज ७७८ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

आतापर्यंत १९ हजार ९६१ रुग्ण बरे होऊन परतले घरी
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.५४ टक्के
आज ६३२ बाधितांची रुग्णसंख्येत भर
अहमदनगर : जिल्ह्यात आज तब्बल ७७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १९ हजार ९६१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.५४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा  वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६३२ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३०४५ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ६६, अँटीजेन चाचणीत ३१५ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २५१ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३५, नगर ग्रामीण ०२, राहुरी ०५, शेवगाव ०१, कोपरगाव ०८, जामखेड १४, मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ३१५ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ६०,  राहाता ४० , पाथर्डी ५०, नगर ग्रामीण १८,  श्रीरामपूर १३, कॅंटोन्मेंट ०३,  नेवासा ४२, श्रीगोंदा ०६, पारनेर ०७, अकोले १८, राहुरी १३, शेवगाव ०९, कोपरगाव १०, जामखेड १५ आणि कर्जत ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २५१ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ११५, संगमनेर १२, राहाता २४, पाथर्डी ०३,  नगर ग्रामीण ३२, श्रीरामपुर २१,  कॅन्टोन्मेंट ०६, नेवासा ०६, श्रीगोंदा ०२,  पारनेर १२, अकोले ०३,  राहुरी ०९, शेवगाव ०१,  कोपरगांव ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ७७८ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा २९९, संगमनेर ९५, राहाता ४३, पाथर्डी ३९, नगर ग्रा.५३, श्रीरामपूर ३१, कॅन्टोन्मेंट १३,  नेवासा २३, श्रीगोंदा २४, पारनेर २६, अकोले १९, राहुरी १४, शेवगाव २७,  कोपरगाव ४०, जामखेड ०७, कर्जत २०, मिलिटरी हॉस्पिटल ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या: १९९६१*
*उपचार सुरू असलेले रूग्ण:३०४५*
*मृत्यू: ३३०*
*एकूण रूग्ण संख्या:२३३३६*
*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here