SSR Case : ड्रग्ज प्रकरणी रिया चक्रवर्तीच्या घरी एनसीबीची धाड, दोन पथकं दाखल

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या घरी एनसीबीची दोन पथकं दाखल झाली आहे. ते रियाच्या घराची झडती घेणार आहे.

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाती ड्रग अँगल समोर आल्यानंतर एनसीबीकडून वेगाने तपास सुरु आहे. एनसीबीच्या तपासा दरम्यान, सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांचे ड्रग्ज तस्करांशी संबंध असल्याचं समोर आलं. या प्रकरणाशी संबंधित अनेक ड्रग्ज तस्करांना अटकही करण्यात आली. यादरम्यान अधिक तपास करण्यासाठी एनसीबीचं एक पथक आज सकाळीच रिया चक्रवर्तीच्या घरी दाखल झालं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here