पिंपरी-चिंचवड प्रशासनाला पवारांचे कठोर बोल म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत मृत्यूदर रोखा

  0

  प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

  कोणत्याही परिस्थितीत मृत्यूदर रोखण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, असा सल्ला दिला. जंबो रुग्णालयात डॉक्टर, रुग्णवाहिकेचे नियोजन व्यवस्थित करावे. पुण्यात पत्रकाराचा झालेला मृत्यू दुर्दैवी आहे. कोणाचाही असा मृत्यू होता कामा नये. राज्य सरकारकडून काही मदत लागली तर सांगा. आवश्यक ती मदत केली जाईल, असे आश्वासन पवार यांनी दिले. 

  या वेळी महापौर माई ढोरे, माजी आमदार विलास लांडे, आझम पानसरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी महापौर योगेश बहल यावेळी उपस्थित होते.

  पत्रकार पांडूरंग रायकर यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त करीत म्हणाले, पत्रकार रायकर यांचा मृत्यू होणे हे दुर्दैवी आहे. कोणाचाही रुग्णवाहिकेअभावी मृत्यू होता कामा नये.

  पवारांच्या सूचना

  – ट्रेसिंग आणि टेस्टिंगवर भर द्या.

  – कोणत्याही परिस्थितीत मृत्यूदर रोखा.

  – जंबो रुग्णालयातील व्यवस्थापन चोख ठेवा.

  – रुग्णवाहिकांचे योग्य नियोजन करा.

  – औद्योगिक आस्थापनांकडे लक्ष द्या.

  – बेड मॅनेजमेंट सिस्टिम काटेकोरपणे राबवा.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here