Karjat : आठवडे बाजार पूर्ववत सुरू करण्यात यावा

0

बाजार विक्रेत्यांची आमदार रोहित पवार यांच्याकडे मागणी

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कर्जत : कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात बंद केलेला आठवडे बाजार पूर्ववत सुरू करावा. आम्ही सर्व बाजार विक्रेते कोव्हीड १९ चे प्रशासनाने दिलेले नियम पुरेपूर पाळू अशी ग्वाही देत आहोत या आशयाचे निवेदन कर्जत येथील आठवडे बाजार विक्रेत्यांनी आमदार रोहित पवार यांना दिले.
मार्च महिन्यापासून कोरोना अनुषंगाने कर्जत येथील आठवडे बाजार स्थानिक प्रशासनाने बंद केले आहे. त्यामुळे अनेक बाजार विक्रेत्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. जवळपास सहा महिन्यांचा अवधी उलटून गेला आहे. आठवडे बाजार बंद असल्यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. याच प्रश्नावर शुक्रवार, दि ४ रोजी कर्जत येथील फारूक पठाण यांनी आमदार रोहित पवार हे कर्जत दौऱ्यावर आले असता, कर्जतचा आठवडे बाजार पूर्ववत सुरू करण्यात यावा.
तसेच आठवडे बाजाराची जागा पहिल्याप्रमाणेच शहरात मिळावी. आठवडे बाजार भरताना सर्व विक्रेते आणि बाजारासाठी येणारे नागरिक – ग्राहक कोव्हिड १९ चे प्रशासनाने दिलेले नियम पुरेपूर पाळतील या आशयाचे निवेदन दिले आहे. यावेळी आमदार रोहित पवार यांनी आपल्या निवेदनाचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन उपस्थित बाजार विक्रेत्यांना दिले.
यावेळी इकबाल पठाण, जाकीर शेख, दत्ता फलके, अशोक भगत, शोएब शेख, किरण क्षिरसागर, अभिजीत महामुनी, राहुल काकडे यांच्यासह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here