पंतप्रधान मोदींच्या ‘या’ व्हिडिओवर तरुणाई संतापली; डिस्कलाईक्सचा धडाका

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणखी एका व्हिडिओवर तरुणाईने डिस्लाईक्सचा धडाका लावला असून बेरोजगारीवरून तरुणाई चांगलीच संतापली आहे. यापूर्वीही त्यांच्या मन की बातच्या यु ट्यूब व्हिडिओला तरुणाईने डिस्लाईक्स करून आपली नापसंती दर्शवली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमच्या लिडरशिपला संबोधित केले होते. या व्हिडिओचे वेगवेगळ्या ठिकाणी प्रसारण करण्यात आले. भाजपच्या ऑफिशिअल युट्यूब चैनलवर त्याचे प्रसारण करण्यात आले. मात्र, या व्हिडिओवर तरुणाईने बेरोजगारीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली.

याव्हिडिओला तब्बल 3 लाखच्या आसपास लोकांनी पाहिले. तर त्यात फक्त 11 हजार जणांनी याला लाईक केलेअसून एक लाखांपेक्षा अधिक जणांनी याला डिस्लाईक केले आहे. गेल्या चारच दिवसांत मोदी यांच्या दोन व्हिडिओला तरुणाईने डिस्लाईक केले आहे. मोदी यांनी बेरोजगारी, अर्थव्यवस्था, परीक्षा याबाबत मन की बातमध्ये न बोलल्याने डिस्ललाईक्सचे प्रमाण वाढले. युट्यूच्या कमेंट बॉक्समध्ये तरुणाईने आपला संताप व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here