Shirurkasar : जमावबंदी आदेश डावलून ऊसतोड कामगारांची जाहीर बैठक घेतल्याप्रकरणी आमदार धस यांच्यासह 70 जणां विरोधात गुन्हा दाखल

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
या वर्षी ऊसतोड मजूरांना दिडशे पट भाववाढ साखर कारखांनदारांनी दिल्याशिवाय मजूर कारखान्याकडे जाऊ देणार नाही, असा ईशारा काही दिवसांपूर्वी दिला होता. गुरुवारी दुपारच्या सुमारास येथील एका मंगल कार्यालयात आमदार सुरेश धस यांनी सामाजिक अंतर पाळून ऊसतोड मजूरांच्या अनेक वर्षांच्या वाढीव मागणीला ख-या अर्थाने धार लावली.

बीड जिल्हा म्हणजे ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारीला ऊसतोड मजूर म्हटलं तर बीड जिल्ह्यातलं परंतु आजपर्यंत मनावी तशी भाववाढ मिळालीच नाही. स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी त्यावेळी भाव वाढ, फरक बिले मिळवून देण्याचे मोठे काम केले होते. आज मजुरांसाठी आमदार धस धाऊन आले आहेत.

खरं पाहिले तर ऊसतोड मजुरांचा कारखान्यावर गेल्यावर प्रश्न अफाट, मोठे काबाडकष्ट करत असताना आरोग्य व ईतर अनेक समस्या निर्माण झाल्यानंतर कारखाना प्रशासन कुठेच धाऊन येत नाही. असा आतापर्यंतचा अनुभव. या वर्षी धडाडीचे आमदार धस यांनी ही मागणी कामगारांच्या हितासाठी केलेली आहे. काल गुरुवारी शिरूरकासार या ठिकाणी बैठक घेतली म्हणून शिरूरकासार पोलीस स्टेशनला आमदार सुरेश धस यांच्या सह 70ते75 ऊसतोड मजूर, मुकादमांवर जिल्हाधिकारी यांच्या जामवबंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत आमदार सुरेश धस यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. परंतु त्यांचे विश्वासू जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पवार बोलताना म्हणाले की,आमचे नेते आमदार सुरेश धस हे गोरगरिबांचे कैवारी आहेत. सर्व सामान्यं ऊसतोड मजुरांसाठी, असे हजारो गुन्हे झेलू. वेळ प्रसंगी रस्त्यावरही उतरू, असेही शिवाजी पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here