Pathardi : वांबोरी चारीचे पाणी उद्यापासून मढी तलावात सोडणार – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
पाथर्डी तालुक्यातील मढी येथील तलावात उद्यापासून वाबोंरी चारीचे पाणी सोडवण्यात येणार आहे, अशी माहिती मढी येथे नामदार ऊर्जा राज्यमंञी, नगरविकास आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे. शुक्रवारी मढी येथे परिसरातील तलावाची  पाहणी केली. प्रत्यक्ष तलावात उतरून माहिती घेतली. त्यानंतर सर्वप्रथम मढी (योजनेचे टेल) पासून तलावात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून कार्यकारी अभियंता यांना पाणी सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे.
योजनेची पाईपलाईन ज्या ठिकाणी फुटलेली असेल किंवा नादुरुस्त असेल ती तातडीने दुरुस्ती करा, असे मंञी तनपुरे यांनी अधिकारी यांना यावेळी सांगितले. मढी ग्रामस्थांनी तलाव दुरुस्तीची मागणी यावेळी केली.
यावेळी श्री क्षेत्र मढी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष शिवशंकर राजळे, राष्टवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत मरकड, बाबासाहेब भिटे, भाऊसाहेब पाटील लवांडे, भगवान मरकड, सचिन मरकड, संदीप राजळे, विष्णू मरकड, इलिअस शेख, दादासाहेब मरकड, कार्यकारी अभियंता सायली पाटील, मढी ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. यावेळी मंत्री तनपुरे यांनी कानिफनाथ देवस्थानच्या मंदिरात न जाता पायरीचे दर्शन घेतले.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here