Ahmadnagar : जिल्ह्यात ‘चेस दी व्हायरस’ मोहीम गतिमान

0
*अधिकाधिक चाचण्या घेण्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे निर्देश*
*घराबाहेर पडताना आरोग्याची काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन*
*जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्ण संख्येने ओलांडला वीस हजारांचा टप्पा*
*आज ५४९ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज तर वाढले ८६७ नवे रुग्ण*
*आतापर्यंत २० हजार ५१० रुग्ण बरे होऊन परतले घरी*
*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.७४ टक्के*
*अहमदनगर*:  ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध बाबींना जिल्ह्यात परवानगी दिली आहे. मात्र, त्याचबरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. त्यामुळेच महानगरपालिका क्षेत्र आणि प्रत्येक तालुक्यात अधिकाधिक चाचण्या घेऊन रुग्णांपर्यंत पोहोचावे आणि संसर्गाची साखळी तुटावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.  यासंदर्भातील निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. त्याचबरोबर, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, घराबाहेर  पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा. आजाराची लक्षणे आढळताच तात्काळ जवळच्या कोविड केअर सेंटर मध्ये जाऊन तपासणी करून घ्या, असे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, आज जिल्ह्यात ५४९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २० हजार ५१० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.७४ टक्के इतके झाले आहे तर काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत ८६७ नवे रुग्ण  आढळले आहेत. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३३४४ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २८२,  अँटीजेन चाचणीत ३२२ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २६३ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १९५, संगमनेर १०, राहाता ०१, पाथर्डी ०५, नगर ग्रामीण २२, श्रीरामपूर ०१, कॅंटोन्मेंट ०६, नेवासा ०२, श्रीगोंदा ११, पारनेर ०३, राहुरी ०२, शेवगाव १३, कोपरगाव ०६, कर्जत ०१,  इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ३२२ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ६२,  राहाता ४० , पाथर्डी ४३, श्रीरामपूर १२, कॅंटोन्मेंट ०९,  नेवासा ४६, श्रीगोंदा २२, पारनेर १९, राहुरी ०५, शेवगाव १६, कोपरगाव ११, जामखेड २१ आणि कर्जत १६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २६३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ८०, संगमनेर १४, राहाता ३५, पाथर्डी ०५,  नगर ग्रामीण १९, श्रीरामपुर ३०,  कॅन्टोन्मेंट ०७, नेवासा २६, श्रीगोंदा ०३,  पारनेर २२, अकोले ०१, राहुरी ०९, शेवगाव ०२,  कोपरगांव ०५, जामखेड ०४ आणि कर्जत ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ५४९ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा २३९ संगमनेर ३६, राहाता २८, पाथर्डी १४, नगर ग्रा.१५, श्रीरामपूर ३९, नेवासा २९, श्रीगोंदा १३, पारनेर १५, अकोले ०८, राहुरी १६, शेवगाव २०,  कोपरगाव ३४, जामखेड १५ कर्जत १५, मिलिटरी हॉस्पिटल १३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या: २०५१०*
*उपचार सुरू असलेले रूग्ण: ३३४४*
*मृत्यू: ३४९*
*एकूण रूग्ण संख्या:२४२०३*
*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here