Beed : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांसाठी कर्जप्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन

1
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय बीड यांनी सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी अनूदान योजनेअंतर्गत 500 लाभार्थी व बीजभांडवल योजने अंतर्गत 25 लाभार्थीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. वरील दोन योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविल्या जातात. मातंग समाजात अंतर्भाव असणाऱ्या बारा पोटजातीतील अर्जदाराकडून विविध व्यवसायासाठी कर्जप्रस्ताव मागविण्यात येत आहे.

या समाजातील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी या पूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज प्रस्ताव दोन प्रतीत खालील ठिकाणी स्वतः अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपस्थित राहून दाखल करावेत. त्रयस्थ, मध्यस्थांमार्फत कर्जप्रकरणे स्वीकारण्यात येणार नाहीत.
कर्जप्रस्तावासोबत जोडावयाची कागदपत्रे
1) जातीचा दाखला (सक्षम अधिकारी यांचेकडून घेतलेला असावा.) 2) अर्जदाराच्या कुटूंबाच्या
उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार यांच्या कडून घेतलेला असावा.) 3) नुकत्याच काढलेल्या
पासपोर्ट साईज फोटोच्या दोन प्रती जोडाव्यात. 4) अर्जदाराचा शैक्षणिक दाखला. 5) रेशन
कार्ड झेरॉक्स प्रती 6) आधार कार्ड / मतदान कार्ड / पॅन कार्ड झेरॉक्स प्रती 7) व्यवसायाचे
दरपत्रक (कोटेशन) 8) व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या जागेची भाडे पावती,
करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा (नमुना नं 8, लाईटबील व टॅक्स पावती 9)
बीजभांडवल योजनेसाठी प्रकल्प अहवाल. 10) वाहनासाठी लायसन्स, परवाने बॅच 11)
व्यवसायासंबधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला. वरीलप्रमाणे कागदपत्रे
स्वयंसाक्षाकीत करुन घोषणापत्रासह देण्यात यावे.
वरील योजनांचा कर्जप्रस्ताव महामंडळाच्या विहीत नमुन्यातील झेरॉक्स/ हस्तलिखीत /टंकलिखीत केलेले अर्ज दि.10 सप्टेंबर ते 20 आॅक्टोबर 2020 पर्यंत  सकाळी 9.45 ते सायंकाळी 5.45 या कार्यालयीन वेळेत महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात , डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नगर रोड, बीड या ठिकाणी स्विकारले जातील.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मांग , मातंग समाजातील बेरोजगार युवक-युवतींनी तसेच होतकरू, गरजू अर्जदारांनी या महामंडळाच्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन व्ही.एस.सोनवणे, जिल्हा व्यवस्थापक, बीड यांनी केले आहे.

1 COMMENT

  1. Greetings! I know this is kinda off topic but I was wondering which blog platform are you using for this site? I’m getting fed up of WordPress because I’ve had problems with hackers and I’m looking at options for another platform. I would be fantastic if you could point me in the direction of a good platform.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here